पुणे

‘सोमेश्‍वर’मधील बंडखोरांची ‘राष्ट्रवादी’कडून हकालपट्टी

CD

बारामती, ता. ९ : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या पॅनेलमधील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बारामतीत शुक्रवारी (ता. ९) घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, संभाजी होळकर, नगराध्यक्ष सचिन सातव यांनी याबाबत माहिती दिली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या यादीत नाव असतानाही पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षादेश डावलून स्वतःचे वेगळे पॅनेल करण्याचा निर्णय घेतला. पक्षशिस्तीचा भंग त्यांनी केलेला असल्याने व प्रचारादरम्यान वारंवार, ‘आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत,’ असे सांगून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याने पक्षाने एकमताने हा निर्णय घेतल्याचे कोरेकर यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचारसभातून बोलताना, ‘जे बाहेर पडलेत त्यांना पुन्हा सामावून घेणार नाही,’ असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. दरम्यान, सतीश काकडे यांचीही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याबाबत विचारले असता, ‘ही क्लिप एआय तंत्रज्ञान वापरून तयार केलेली आहे,’ असा खुलासा सतीश काकडे यांनी केला असल्याचे राजेंद्र कोरेकर यांनी सांगितले.

वेळ न पाळल्याने नाराजी
पत्रकार परिषदेसाठी साडेनऊची वेळ दिलेली असताना राजेंद्र कोरेकर सव्वादहा वाजेपर्यंत पत्रकार परिषदेच्या ठिकाणी फिरकलेच नाहीत. उशिरा आल्याने त्यांना बारामतीतील पत्रकारांच्या नाराजीचा सामना करावा लागला. आयुष्यभर वेळ पाळणाऱ्या अजितदादांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना वेळेची किंमत नसल्याचे सांगत पत्रकारांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. स्थानिक नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

Maharashtra Live News : सीईसीविरोधातील आंदोलनांप्रकरणी सात दिवसांत २७ एफआयआर दाखल

नवरा असावा तर फडणवीसांसारखा! पती अन् मुलीसमोर अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं, असं केलं बायकोचं कौतुक

Kaygaon News : कायगाव परिसरात ऊसतोडणी हंगामाची चाहूल; ऊसतोड मजूर दाखल, मात्र दुष्काळाने उसाची वाढ खुंटली, उत्पादन घटणार

SCROLL FOR NEXT