vijay wadettiwar sakal
पुणे

Baramati News : निकोप लोकशाही पत्रकारांनी टिकवावी - विजय वडेट्टीवार

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा प्रारंभ शनिवारी (ता. 18) बारामतीत विजय वडेट्टीवार बोलत होते.

मिलिंद संगई

बारामती - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांनी निकोप लोकशाही टिकवून ठेवली पाहिजे, लेखनस्वातंत्र्य जपत सामान्यांना न्याय देण्याचे काम पत्रकारांनी करावे, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा प्रारंभ शनिवारी (ता. 18) बारामतीत झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. खासदार हेमंत पाटील, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, प्रकाश पोहरे, बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राजश्री पाटील, सकाळचे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, माजी आमदार रामराव वडकुते, अधिवेशन संयोजक अजित कुंकूलोळ, बारामतीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सूत्रांच्या आधारे होणारी सोयीची पत्रकारिता बदलली पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारिता मजबूत असली पाहिजे. निकोप लोकशाहीसाठी खरी पत्रकारिता व्हावी. पत्रकारांनी सामान्यांच्या व्यथा वेचून मांडाव्यात.

उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित नव्हते, सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा संदेश वाचून दाखविला. अधिवेशनासाठी बारामतीची निवड केल्याबद्दल त्यानी आभार व्यक्त केले. माध्यमांनी काम करताना विश्वासार्हतेबाबत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

पत्रकारांच्या व्यथा केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचवून अशी ग्वाही खासदार हेमंत पाटील यांनी दिली. बारामती जिल्ह्याला लाजवेल अशी आहे, पत्रकारांनी विकासाचा हा संदेश आपापल्या भागात पोहोचवावा, असे ते म्हणाले.

संदीप काळे यांनी प्रास्ताविकात संस्थेत्या कार्याचा आढावा घेतला. येत्या दीड वर्षात सदस्य संख्या तीन लाखांवर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किमान वेतन, घर नाही, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही या मुळे पत्रकारांची परवड होते आहे, या साठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी कल्याणकारी मंडळ द्यावे अशी मागणी अनिल म्हस्के यांनी केली.

हिंगोलीच्या पत्रकारांच्या घरांसाठी खासदार हेमंत पाटील व पालकमंत्री अब्दुलसत्तार यांनी पाच लाखांच्या निधीचा धनादेश सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिंगोलीच्या पत्रकारांना सुपूर्द केला गेला. सूत्रसंचालन फराह खान यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT