पुणे

बारामती शहरात उद्यापासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

CD

बारामती, ता. २२ : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे नीरा डावा कालव्याचे आवर्तन सध्या बंद असल्याने आवश्यक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेने मंगळवारपासून (ता. २३) दोन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी (ता. २३) कसबा, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमान नगर, सातव वस्ती, शिवाजी नगर, कारभारी नगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशील नगर, साठेनगर, जुना व नवा मोरगाव रोड परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
बुधवारी (ता. २४) म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, साळवेनगर, कॅनॉल रोड परिसर, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, पोस्ट रोड, एस.टी. स्टँड परिसर, जवाहरनगर, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, विजयनगर, साईगणेशनगर, आनंदनगर, वसंतनगर, अवधूतनगर, व्हिल कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर आदी परिसरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शहरातील सायली हिल व जळोची येथील जलशुद्धीकरण केंद्रावरुन होणारा पाणीपुरवठा मंगळवारी (ता. २३) तांदुळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, निरा कॅनॉल सोसायटी, दुधसंघ सोसायटी या परिसरात पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी पाणी उपलब्ध होईल.
बुधवारी (ता. २४) संपूर्ण रुई परिसर, डेरेवस्ती, सायली हिल, सूर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बायळे वस्ती, तान्हाई नगर, महीला सोसायटी, प्रगतीनगर येथे दोन दिवसांनी पाणी उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Parner News : माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणार

Pali News : ऐतिहासिक वारशाचे जतन! अवचितगडाच्या दरीतून 350 ते 400 किलोच्या 2 तोफांना काढले

Akola Atrocity Act News: अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रकरणांत कायद्याचे तंतोतंत पालन करा : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे निर्देश

मोठी बातमी! TMC च्या ६० आमदारांनी ममता बॅनर्जीना अध्यक्षपदावरून हटवलं, अभिषेक बॅनर्जींनाही केलं सस्पेंड, राजकारण तापलं...

SCROLL FOR NEXT