पुणे

बार्शीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात तपासणी

CD

BAR26B14026
बार्शी : बार्शीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात तपासणी करताना श्वान आणि अधिकारी.

बार्शीच्या न्यायालयात
बॉम्बशोधक अन्‌ श्वान पथक

सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. २ : सोलापूरसह बीड, सातारा आणि ठाणे व इतर जिल्हा न्यायालयांच्या इमारती उडवून लावण्याची कथित धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलिस सतर्क झाले आहेत. सोमवारी (ता. २) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांकडून बार्शीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीची सोलापूरच्या बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकामार्फत कसून तपासणी करण्यात आली.
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले. मोठ्या शहरांत मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलिसही सतर्क झाले आहेत. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गणेश कुंभार यांनी केले आहे.
इतर शहरांत आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी पोलिसांनी तत्काळ सोलापूरहून बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक पाचारण केले. येथील न्यायाधीशांसह वकील आणि सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून न्यायालयाचा परिसर पिंजून काढत कसून तपासणी करण्यात आली. परंतु, कोठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिस उपअधीक्षक सुहास जगताप, पोलिस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ढोरे आणि अभय माकणे यांच्यासह सोलापूर येथून आलेल्या अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी न्यायालय परिसराची तपासणी केली.

Life Abroad: भारतात घर घेणे अवघड असलेल्यांना विदेशात व्हिला अन् महागड्या गाड्या कशा घेता येतात?

Narendra Modi: जागतिक ऊर्जा संकटाचा भारतावर प्रभाव का पडला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पोकलेन अंगावर पडून शेतकरी मजुराचा मृत्यू

Pune Weather: पुण्यात परतीच्या पावसाची पाठ; ऑक्टोबरमध्ये अवघा १.७ मिमी पाऊस, ११ वर्षांतील नीचांकी नोंद

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT