beaten a farmer sakal
पुणे

ठेकेदाराची कामगाराला मारहाण; नंतर दिले पहिल्या मजल्यावरुन फेकून

सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वादावादीतून ठेकेदाराने कामगाराला पहिल्या मजल्यावरुन फेकून दिल्याची घटना वडगाव खुर्द येथील एका बांधकाम प्रकल्पावर घडली. याप्रकरणी दोघांना सिंहगह पोलिसांनी अटक केली आहे. संजय मुरलीधर तुंबर (वय 46), रामचंद्र किसन वाघचौरे ( वय 36, रा.वाघोली), गोविंद पांडुरंग निंबाळकर (वय 47, रा. मानाजी बाग, बोपोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मंतसीर हासीफ आलम (वय 21, रा.वडगाव खुर्द ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे सहकारी वडगाव खुर्द येथील एका बांधकाम प्रकल्पावर काम करतात. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा सहकारी जुनेद यास बांधकाम प्रकल्पावरील काम आणि पगारामुळे झालेल्या वादातून संजय तुंबर, रामचंद्र वाघचौरे व गोविंद निंबाळकर असे तिघे मारहाण करीत होती. त्यावेळी फिर्यादी आलम यांनी मध्यस्थी करून तुम्ही आमच्या कामाबाबत आमच्या ठेकेदाराशी बोला, असे सांगितले.

त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीस लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करत जिन्याने ओढत पहिल्या मजल्यावर नेले. तेथेही पुन्हा बेदम मारहाण करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. त्याचबरोबर जुनेदलाही जबर मारहाण केली. संबंधीत इमारतीच्या कामाचा ठेका आरोपींनी घेतला आहे. आलम हा ठेकेदारामार्फत तेथे काम करतो. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक दिपक खेडकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT