Vaccination to Children
Vaccination to Children Sakal
पुणे

कोरोना संसर्गापासून बालकांना वाचविण्यासाठी गोवरच्या लसीचा फायदा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना संसर्गापासून (Corona Infection) बालकांना (Child) वाचविण्यासाठी गोवरच्या लसीचा (Measles Vaccine) फायदा (Benefit) होत असल्याची बाब तुलनात्मक संशोधनातून (Research) पुढे आली आहे. पुण्यातील बालरोग तज्ज्ञांनी केलेले हे संशोधन ह्यूमन वॅक्सिन्स अँड इम्युनोथेरपीटिक्स या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. (Benefits of Measles Vaccine to Protect Children from Corona Infection)

बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर यांनी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने केला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.मालनगोरी परंडे यांचा या संशोधनात सहभाग असून, जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन असल्याचे डॉ.गुजर यांनी सांगितले. टेस्ट निगेटिव्ह केस कंट्रोल पद्धतीचा वापरातून गोवर, एमआर, एमएमआर लसींची कोरोना विरुद्ध ८७.५ टक्के परिणामकारकता सिद्ध झाली आहे.

असे झाले संशोधन :

- एक ते १७ वयोगटातील ५४८ मुलामुलींची अध्ययनासाठी निवड

- पुणे महापालिका क्षेत्रातील या बालकांची दोन गटात विभागणी

- कंट्रोल आणि अनकंट्रोल अशा गटातील बालकांच्या लसीकरणाची माहिती मिळविण्यात आली

- त्यांच्या कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणी नंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष निश्चितच आश्वासक आहे. प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्या घेऊन अधिक खातरजमा शास्रज्ञानी करायला हवी. जो पर्यंत बालकांना प्रत्यक्ष कोरोनाची लस मिळत नाही तो पर्यंत ही लस महत्वपूर्ण भूमिका बजावेल.

- डॉ. निलेश गुजर, बालरोगतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT