Terrorist in Pune esakal
पुणे

Pune News : बंगळूर बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात? तपास यंत्रणा अलर्ट

बंगळूर येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय तपास (एनआयए) यंत्रणेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बंगळूर येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय तपास (एनआयए) यंत्रणेला आहे. बंगळुरमधून बल्लारी आणि तेथून भटकळ, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

बंगळूर येथील रामेश्वरम कॅफेत एक मार्च रोजी दुपारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या स्फोटात कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसह दहा लोक जखमी झाले होते. गृह मंत्रालयाने या बॉम्बस्फोटाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला आहे. या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले.

टोपी, मास्क आणि चष्मा घातलेला हा संशयित दहशतवादी कॅफेत प्रवेश करताना आढळून आला. स्फोटकांनी भरलेली पिशवी ठेवून तो तेथून पसार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आले आहे. स्फोट घडवण्यासाठी टायमरसह आयईडी उपकरण वापरण्यात आले होते.

स्फोटानंतर संशयित दहशतवादी बंगळूरमधून बसने पसार झाला. तो बल्लारी बसस्थानकात उतरल्याची माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना मिळाली. बल्लारी स्थानकातून तो दुसऱ्या बसने गोकर्णपर्यंत गेला. तेथून तो बसने पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तो नक्की पुण्यात आला की दुसऱ्या ठिकाणी गेला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

याबाबतची माहिती तपास यंत्रणांनी ‘एनआयए’च्या पुणे आणि मुंबईतील पथकांना दिली आहे. बंगळूर आणि बल्लारी बसस्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. भटकळ आणि गोकर्ण बसस्थानकातील चित्रीकरणाच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास ‘एनआयए’ने १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे ‘एनआयए’ने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT