पुणे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात

CD

भांडवलीच्‍या शाळेची शताब्दी उत्साहात

आजी- माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांची उपस्थिती; १९२६ मध्ये सुरू झाली ज्ञानगंगा

दहिवडी, ता‌. २६ : माण तालुक्यातील भांडवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव अतिशय भावपूर्ण व उत्साही वातावरणात झाला.
जीवन शिक्षण विद्यामंदिर या नावाने या शाळेची स्थापना २६ फेब्रुवारी १९२६ रोजी झाली. सुरुवातीला जनावरांच्या गोठ्यात शाळा भरत असे. नंतर मंदिरात तर कधी कोणाच्या घराच्या ओट्यावर विद्यार्थी बसत असत. शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी भांडवलीसह शिरवली, शिंदी खुर्द, बोथे, तेलदरा येथून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. शाळेच्या इमारतीसाठी महंत श्री विठ्ठलगिरीजी महाराज यांनी जागा दिली व शाळेला पहिली खोली १९६२ रोजी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभी राहिली. नंतर १९६८ रोजी सदाशिवराव पोळ यांच्या प्रयत्नातून शाळेला नवीन दोन खोल्या मिळाल्या. अशाप्रकारे शाळेची  सुसज्ज इमारत उभी राहिली.
या शाळेत शिकून मोठे झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणांहून शताब्दी महोत्सवासाठी उपस्थित झाले होते. अनेक वर्षांनी भेटलेल्या मित्रांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी वातावरण भावनिक झाले होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आपल्या यशाचे श्रेय शाळेला दिले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते बिरा लोखंडे यांनी मराठी शाळा का टिकली पाहिजे? शाळेच्या सुख, सुविधा, मराठी शाळेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी वयोवृद्ध माजी विद्यार्थ्यांकडून केक कापून शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख साधना झणझणे, जीवन इंगळे, ग्रामसेवक शिंदे, सरपंच इंदुमती गुरव, उपसरपंच तेजस्वी सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तेजश्री सूर्यवंशी, शाळेत सेवा करून गेलेले पांडुरंग कुलकर्णी, राजाराम खरात, किशोर देवकर, हौसाबाई खरात, अन्सार मुलाणी आदी शिक्षक उपस्थित होते. स्वाती ढोक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. दत्तात्रय बारसवडे यांनी प्रास्ताविक केले. हणमंतराव जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक राजेंद्र यादव यांनी उपस्थितांचे व शाळेला कर्तव्यनिधी देणाऱ्यांचे आभार   मानले. कार्यक्रमास शाळेचे आजी, माजी विद्यार्थी, पालक, महिला, तरुण मंडळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.....................................................................

छायाचित्र
MLV26B07321
भांडवली (ता. माण) : केक कापून शाळेचा वाढदिवस साजरा करताना आजी, माजी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
.............................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT