Pune_Crime 
पुणे

तुम्ही मास्क का घातला नाही? एवढंच विचारलं अन् मग...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विना मास्क सोसायटीत आलेल्या तरुणांना हटकल्यावरून झालेल्या भांडणात चौघांनी एकास बांबू आणि लाथा-बुक्क्यांनीे बेदम मारहाण केली. आंबेगाव खुर्दमधील हनुमाननगरमध्ये सोमवारी (ता.२०) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

कृष्णा बबन लोखंडे (वय-२२), अजय भागवत घाडगे (वय-२१ दोघे रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द) आणि अनिल संभाजी नेटके (वय-२१, रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमित पाटील (वय-३९, रा. आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी राहत असलेल्या आंबेगाव खुर्द येथील साईसमर्थनगरी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आरोपी मास्क न घालता उभे होते. त्यामुळे फिर्यादी पाटील यांनी त्यांना हटकले. तुम्ही मास्क का घातला नाही? अशी त्यांना विचारणा केली. त्यावरून चौघा आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. आरोपींनी फिर्यादींना लाथा-बुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली.

त्यामध्ये फिर्यादीच्या डोळ्याला, चेहऱ्यास तसेच उजव्या हातास मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक ए. आर. कवठेकर करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT