पुणे

ठेकेदाराच्या चुकीमुळे ‘भीमाशंकर’ची बदनामी

CD

पारगाव, ता. ५ : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातून प्रदूषित पाणी सोडल्याचा आरोप ठेकेदाराच्या चुकीमुळे होत आहे. हा कारखान्याच्या बदनामीचा प्रयत्न असून, आमची प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सुसज्ज आहे. स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची आम्ही खात्री देतो, असा खुलासा कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केला आहे.
कारखान्याचा गाळप हंगाम २० फेब्रुवारी २०२६ला संपला असून, पाच महिन्यांपासून उत्पादन बंद आहे. त्यामुळे कारखान्यातून सांडपाणी बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ढगे यांनी स्पष्ट केले. पुढील हंगामाच्या तयारीसाठी केवळ तळ्याची साफसफाई सुरू होती. कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा असून, उसाला सर्वाधिक भाव देणे हे आमचे ध्येय आहे. परिसरातील अनेक कुटुंबे कारखान्यावर अवलंबून असून, त्यांच्यामुळेच भागाचा आर्थिक विकास होऊन जीवनमान उंचावले आहे. त्यामुळे कोणीही या महत्त्वपूर्ण संस्थेची विनाकारण बदनामी करू नये, असे आवाहन ढगे यांनी केले आहे. कारखाना स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची नेहमीच काळजी घेईल, असेही त्यांनी नमूद केले.

नेमके काय घडले? 
सांडपाणी तळ्यातील गाळ काढण्याचे कंत्राट दीपक करंडे यांना दिले होते. करारानुसार, त्यांनी टँकरने गाळ उचलणे बंधनकारक होते. मात्र, सोमवारी (ता. ३) रात्री नऊच्या सुमारास करंडे यांनी अधिकाऱ्यांची परवानगी न घेता तळ्यात पाणी सोडून पंपाद्वारे गाळमिश्रित पाणी थेट बाहेर सोडले. त्यांच्या या अनधिकृत कृतीमुळे गैरसमज निर्माण झाल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT