Bhimashankar sugarcane factory gate Best factory award
Bhimashankar sugarcane factory gate Best factory award 
पुणे

भीमाशंकर कारखाण्यास देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाणा पुरस्कार

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर(पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नवीदिल्ली येथील राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ यांच्या वतीने 2017-18 करिताचा 'देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाणा पुरस्कार' माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 9 साखर कारखाणे, हरियाणा 3, उत्तरप्रदेश 4, मध्यप्रदेश1, गुजरात 1, तामिळनाडु 1 साखर कारखान्यास पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे शुगरकेन मंत्री सुरेश राणा, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष अमीत कोरे, माजी अध्यक्ष जयंतीभाई पटेल, कल्लाप्पाणा आवाडे, खासदार विजयसिंह मोहीते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थीत होते.

पुरस्काराचा स्विकार भीमाशंकरचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, भीमाशंकरचे माजी अध्यक्ष व संचालक देवदत्त निकम, संचालक प्रदिप वळसे पाटील, बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, ज्ञानेश्वर गावडे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, आण्णासाहेब पडवळ, भगवान बोर्हाडे, तानाजी जंबुकर, ज्ञानेश्वर आस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकीनी हांडे, रमेश लबडे, उत्तम थोरात, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे यांनी केला. 

आर्थिक वर्षात केलेले ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजणा, आर्थिक व्यवस्थापन, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणुक, वेळेत अदा केलेले ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्तमुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध नीधी, विनीयोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करुन भीमाशंकर कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगीतले. कारखान्याचे संस्थापक/अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडाळाचे धोरण, आधिकारी व कर्मचार्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे.

कारखान्यास देशपातळीवरील 10 व राज्य पातळीवरील 9 असे एकुण 19 पुरस्कार प्राप्त झाले आहेत देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना पुरस्कार चार वेळा मिळविणारा देशातील भीमाशंकर हा एकमेव कारखाना असल्याचे उपाध्यक्ष बेंडे यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT