पुणे

सौरउर्जा योजनेबाबत धावडे वस्तीत जनजागृती

CD

भोसरी, ता. २१ ः महावितरणच्या भोसरी विभागाद्वारे भोसरीतील धावडे वस्तीमध्ये स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सौरउर्जा योजनेची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन भोसरी महावितरण विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले.
यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता अतुल देवकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सोमनाथ माने, राजेश भगत, प्रभाकर झोपे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य अभियंता काकडे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी नागरिकांचे दर महिन्यांचे वीज देयक शून्य रुपयाचे येण्यासाठी महाराष्ट्र आवासीय सौरउर्जा योजनेद्वारे छतावर सोलर पॅनेल बसविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान मिळत असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. मार्च २०२७ पर्यंत या योजनेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. सोलार पॅनेल बसविण्याचा एकूण खर्च पन्नास हजार रुपये आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना अडीच हजार, अनुसूचित जाती-जमातीसाठी पाच हजार तर सर्वसाधारण गटातील नागरिकांना दहा हजार रुपये भरावे लागणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT