bhor resul
bhor resul 
पुणे

भोरच्या विद्यार्थ्यांकडून 11 टक्क्यांची घसघशीत वाढ  

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर तालुक्यातील इयत्ता दहावीच्या निकालाच्या टक्केवारीत या वर्षी १०.७८ टक्क्याची वाढ झाली असून, तालु्क्यातील ५० विद्यालयांपैकी २९ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. १९ विद्यालयांचा निकाल ९० टक्यांपेक्षा जास्त असून, केवळ २ विद्यालयांचा निकाल ८५ च्या पुढे आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ८७ टक्के लागला होता, तर केवळ १५ विद्यालयांचा निकाल १०० टक्के होता.

भोर तालुक्यातून या वर्षी २ हजार २१४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी सर्वाधिक ८८७ विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन श्रेणी मिळाली आहे. त्याखालोखाल ८०३ विद्यार्थ्याना अ श्रेणी आणि ४२६ विद्यार्थ्यांना ब श्रेणी मिळाली आहे तर, केवळ ४९ विद्यार्थी पास श्रेणीत आहेत. भोरमधील राजा रघुनाथराव विद्यालयात सर्वाधिक २४६ विद्यार्थी, तर अमृतराव बांदल विद्यालय सांगवी- येवली विद्यालयात सर्वात कमी ८ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. या वर्षी पांगारी व करुंजी येथील शासकीय आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. लॉकडाउनमुळे भोर शहरातील 'रोबोकॉब कॉम्प्युटर्स' या एमएससीआयटी केंद्रांमार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रत घरी मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

भोर तालुक्यातील १०० टक्के निकाल लागलेले हायस्कूल पुढीलप्रमाणे ः पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे, शिवाजी विद्यालय नसरापूर, न्यू इंग्लिश स्कूल न्हावी, वीर बाजी पासलकर विद्यालय शिंद, पिसावरे माध्यमिक विद्यालय, पसुरे माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वरवे, न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली, अप्पासाहेब बांदल विद्यालय आळंदे, घेवडेश्वर माध्यमिक विद्यालय महुडे, येसाजी कंक माध्यमिक विद्यालय करंदी (वाढाणे), कान्होजी जेधे विद्यालय कारी, रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टिटेघर, रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय नाटंबी, संत लिंगनाथस्वामी विद्यालय निगडे, रायरी माध्यमिक विद्यालय, कुरुंजाई माध्यमिक विद्यालय कुरुंगवडी, शासकीय आश्रमशाळा पांगारी, विजय मुकुंदराव आठवले माध्यमिक विद्यालय माळेगाव, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय केळावडे, पालसिध्देश्वर माध्यमिक विद्यालय पाले, अमृतराव बांदल माध्यमिक विद्यालय सांगवी, बारे- बसरापूर माध्यमिक विद्यालय बारे, समर्थ विद्यामंदीर वेळवंड, शासकीय आश्रमशाळा कुरुंजी, जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल भोर, अमृता विद्यालयम नसरापूर, भोर इंग्लिश मिटीयम स्कूल आणि कृष्णाई इंगिश मिडीयम स्कूल चिखलावडे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
  
तालुक्यातील इतर शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे ः राजा रघुनाथराव विद्यालय भोर (९८.३७), छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी (९८.९६), छत्रपती शिवाजी विद्यालय भोर (८५.३६), नागेश्वर विद्यालय आंबवडे (९७.०५), महात्मा फुले प्रशाला शिंदेवाडी (९७.५६), क्रांतीवीर फडके विद्यालय चिखलगाव (९३.७५), न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर (९२), सारोळे माध्यमिक विद्यालय (९५.९१), गर्ल्स हायस्कूल भोर (९८.१८), आपटी माध्यमिक विद्यालय (९४.२३), काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे (९६.६६), शिदोजी थोपटे विद्यालय खानापूर (९८.२४), जोगवडी माध्यमिक विद्यालय (९६.५५),  मुरारबाजी देशपांडे विद्यालय वाठारहिंगे (९०), बाजी पासलकर विद्यालय बाजारवाडी (९३.३३), काळेश्वरी माध्यमिक विद्यालय अंबाडे (९५.४५), जिजामाता विद्यालय (९७.३९), समर्थ रामदासस्वामी विद्यालय हिर्डोशी (९६.५५), न्यू इंग्लिश स्कूल कामथडी (९६.६६), न्यू इंग्लिश स्कूल कुसगाव (९७.७२), माध्यमिक विद्यालय कांबरे (७९.२८).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT