bibwewadi now pushes the parents from the bouncer in undri pune sakal
पुणे

पुण्यात पुन्हा पालकांना धक्काबुक्की

खासगी शाळांचा मनमानी कारभाराला आळा बसणार का?; पालकांचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरिअल शाळेनंतर पुन्हा एकदा पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेत पालकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. शालेय शुल्काबाबत शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करणाऱ्या पालकांना शाळेकडून दुजाभाव करण्यात आला. संबंधित विद्यार्थ्यांना शाळेने प्रवेश नाकारलाच, एवढेच नव्हे तर खुद्द शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला शाळेने केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले.

नुकताच बिबवेवाडी येथील शाळेतील बाऊन्सरकडून पालकांना मारहाण झाल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना केल्या. परंतु शाळेत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पोचले आणि शाळेतील सुरक्षा रक्षक आणि बाऊन्सर यांच्याकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आली काही विद्यार्थ्यांना शाळेने आज प्रवेश दिला नाही. या विरोधात पालकांनी पुन्हा एकदा पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांची भेट घेतील. थोड्याच वेळात खुद्द शिक्षण उपसंचालक शाळेला भेट देणार आहेत. शाळेची काही त्रुटी आढळल्यास तातडीने शाळेवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी पालकांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT