big information in bhushi dam tragedy ansari family drowned shocking reason  Esakal
पुणे

Bhushi Dam : जर या गोष्टीचं पालन केलं असतं तर आज अन्सारी कुटुंबातील सदस्य असते जिवंत, भुशी डॅम दुर्घटनेत चार जणांचे मृतदेह सापडले

Bhushi Dam : ही दुर्दैवी घटना घडली मात्र, जर अन्सारी कुटुंबाने जर त्या ठिकाणी लावलेल्या सूचनांचे पालन केले असते तर ते आज जिवंत असते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

वर्षाविहाहारासाठी भुशी धरणामागील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या हडपसरमधील पाच जणांपैकी चौघींचा मृत्यू झाला, तर एक जण बेपत्ता आहे. सर्व जण एकाच परिवारातील असून, ही घटना रविवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. ही दुर्दैवी घटना घडली मात्र, जर अन्सारी कुटुंबाने जर त्या ठिकाणी लावलेल्या सूचनांचे पालन केले असते तर ते आज जिवंत असते.

पुण्यातील अन्सारी कुटुंब पर्यटनासाठी लोणावळ्याला गेलं होतं. मात्र त्यानंतर हे कुटुंब भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसात पाण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 9 जण अडकले. पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर ते त्यासोबत वाहून गेले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आलं मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. यातील चार जणांचा मृतदेह सापडला आहे, मात्र अद्यापही एकाचा शोध सुरू आहे.

दरम्यान या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ते ज्या ठिकाणी गेले होते तिथे जाण्यासाठी बंदी असताना देखील हे कुटुंब या धबधब्याकडे गेलं त्यातील ५ जणांना आपला जीव गमावला लागला. सूचना फलकावरील सूचनेचं पालन केलं असतं तर कदाचित सर्वांचे जाव वाचले असते. लोणावळ्यात पर्यटन करताना सावधानता बाळगा असा इशारा देऊन ही पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे, भुशी डॅम परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांना प्रशासनाने सूचना फलकाद्वारे सूचित केलं आहे.

शाहिस्ता अन्सारी (वय ३७), अमिना सलमान ऊर्फ अदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), उमेरा सलमान ऊर्फ अदिल अन्सारी (वय ७) अशी मृतांची नावे आहेत, तर अदनान अन्सारी (वय ४) हा बेपत्ता आहे. अंधार पडल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले. धरण भरल्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली.

अतिउत्साहीपणा बेतला जिवावार

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, याची अन्सारी कुटुंबास कल्पना नव्हती. दरम्यान पाण्याचा अचानक लोंढा आल्याने पाचजण प्रवाहात वाहून गेले. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. कुटुंबातील वाहून जाणाऱ्या अन्य तिघांनी आपला जीव वाचविला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिस, शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्थांच्या सदस्यांसह आयएनएस शिवाजी केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

दुपारी सव्वाचारच्या सुमारास शाहिस्ता अन्सारी, अमिमा अन्सारी व उमेरा अन्सारी यांचे मृतदेह शिवदुर्गच्या बचाव पथकांना आढळून आले. आयएनएस शिवाजी केंद्राच्या स्कुबा डायव्हिंग जवानांनी पाण्याच्या तळाशी मृतदेहांचा शोध घेतला. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने दोघांचे मृतदेह आढळले नाहीत. अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले. सोमवारी (ता. १) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येईल, असे लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT