Two Wheeler Accident
Two Wheeler Accident Sakal
पुणे

Pune : भरधाव वेगात येणार्या चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

कुरकुंभ- पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गच्या कुरकुंभ ( ता. दौंड ) येथील सेवारस्त्यावर समोरील बाजूने भरधाव वेगात येणार्या चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झल्याने ठार झाला तर आणखी एक पादचारी जखमी झाला. हा अपघात गुरूवारी ( ता.१६ ) राञी सातच्या सुमारास घडला होता.

कुरकुंभ येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या इंडियन पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी राञी सातच्या सुमारास सेवारस्त्यावर सोलापूरकडून येणारी चारचाकी ( एमएच.१४,एफजी.१७७२ ) गाडीने समोरून बाजूने येणार्या दुचाकीला ( एमएच.४२,एनझेड.९१०४ ) जोरात धडक दिली.

या अपघात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार बाळू बबन जाधव ( वय ४९, रा. साळुंखेवस्ती कुरकुंभ, ता. दौंड ) यांचा मृत्यू झाला. तर आणखी एका अनोळखी पादचार्याला चारचाकीची धडक बसल्याने जखमी झाले. यासंदर्भात मृत व्यक्तीचा पुतण्या किरण शिवाजी जाधव ( रा. मळद,ता.दौंड ) यांनी पोलिसात फिर्याद दिली.

याप्रकरणी पोलिसांनी अपघातातील चारचाकी चालक विजय नामदेव चव्हाण ( रा. सिध्दीविनायक सोसायटी, फेज १. वारुळवाडी, नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे ) याच्याविरूध निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून एक मृत्यू व एक जखमी केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम-३०४ (अ). २७९,३३७,३३८,४२७ व मोटर वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT