पुणे

पुणे : ओएलएक्सवरून विक्री केलेली दुचाकी बनावट चावीने चोरीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऑनलाईन खरेदी केलेल्या दुचाकी बनावट चावीने चोरून नेत चोरट्याने तरुणाला 30 हजारांचा गंडा घातला. चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले असता, फोन करण्याच्या बहाण्याने बाहेर येऊन चोरट्याने विक्री केलेली दुचाकी बनावट चावीने चोरून नेली. ही घटना 11 नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विमाननगरमधील फिनिक्‍स मॉलमागील हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी दर्शन अगरवाल (वय 35, रा. वाघोली) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रसाद नागरगोजे (वय 21, रा. एमएमसीसी कॉलेज) यांनी याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यांना जुनी दुचाकी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी ओएलएक्‍सवर जुन्या दुचाकींची माहिती घेतली. दर्शन याची दुचाकी त्यांना आवडली. त्यानुसार दर्शनने फिर्यादी यांना दुचाकी पाहण्यासाठी विमानतळ येथील फिनिक्‍स मॉलजवळ बोलावले.

तीस हजार रुपयांना दुचाकी देण्याचा व्यवहार त्यांच्यात झाला. त्यानुसार फिर्यादी यांनी गुगल पेद्वारे दर्शनच्या खात्यात 30 हजार रुपये पाठविले. त्यानंतर दर्शन प्रसादला चहा पिण्यासाठी एका हॉटेलात घेऊन गेला. दोघे चहा पित असताना दर्शनने फोन आल्याचा बहाणा करीत हॉटेलबाहेर गेला. त्यानंतर दर्शन बनावट चावीने दुचाकी घेऊन पसार झाला.

हॉटेलमध्ये बराच वेळ वाट पाहूनही दर्शन परत न आल्यामुळे प्रसाद बाहेर आला. त्यावेळी हॉटेलबाहेर त्याला दुचाकी दिसून आली नाही. तसेच गुगल पे खात्यावर रक्कम पाठविलेला दर्शनही दिसून आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रमोदने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT