Amit Shah Criticizes Sharad Pawar  esakal
पुणे

Ajit Pawar: अमित शाह म्हणाले शरद पवार भ्रष्ट्राचाराचे सरदार, भाजपसोबत असलेल्या अजितदादांची प्रतिक्रिया काय?

Amit Shah Criticizes Sharad Pawar In Pune: अमित शाहांच्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात एक नवीन चर्चा निर्माण झाली आहे, आणि विरोधकांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.

Sandip Kapde

पुणे येथे भाजप महाराष्ट्राच्या प्रदेश अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांवर वैयक्तिक हल्ला चढवला. "शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे अध्यक्ष," अशी टीका अमित शहांनी केली.

मराठा आरक्षणावरून टीका-

अमित शाहांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही शरद पवारांवर टीका केली. "जेव्हा जेव्हा राज्यात भाजपचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण मिळते, पण जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होते. २०१४ मध्ये आम्ही आरक्षण दिले आणि पुन्हा आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण मिळेल. मात्र, शरद पवारांच्या सरकारने आरक्षण गायब केले," अशी टीका शाहांनी केली.

अजित पवार काय म्हणाले?

अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर भाजपसोबत सत्तेत असलेले अजित पवार म्हणाले, "अमित शाह शरद पवार यांच्याबद्दल काय बोलले मला माहित नाही. मी दिवसभर कामात होतो. ते काय बोलले पाहून प्रतिक्रिया देतो."

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया-

शरद पवार यांच्या विरोधातील टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही."

अमित शाह ज्या पक्षामध्ये आहेत त्यांनी शरद पवार यांना पद्मविभूषणची पदवी दिली, त्या सरकारने त्यांचा सन्मान केला. प्रधानमंत्री दोन वेळा बारामतीत येऊन गेले, प्रधानमंत्र्यांनी देखील शरद पवार यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. भाजपच्याच नेत्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्वजन त्यांच्याच पक्षात आहेत.  देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आता त्यांच्याबरोबरच भाजप सत्तेत राहून काम करत आहेत. अमित शाहांच्या व्यासपीठावर असलेल्या अशोक चव्हाणांवर देखील भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र ते आता भाजपमध्ये आहेत, असे देखील सुळे म्हणाल्या.


सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया-

सुषमा अंधारे म्हणाल्या, "अमित शाह यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळे उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्कीच स्पष्ट झाले. एक म्हणजे आजही अमित शाह यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे. ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा तुम्ही पुण्यामध्ये केली त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केले की पार्लमेंटमध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश पिठोडी यांनी जी सवंग भाषा केली होती त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतमस्तर अमित शाह तुम्ही आज पुण्यामध्ये गाठला आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT