Congress BJP 
पुणे

मलाही भाजपची ऑफर होती; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पुण्यात गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : विधानसभेला दोन्ही कॉंग्रेस प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून ३८ जागा मित्रपक्षांना सोडणार असल्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पिंपरीत सांगितले. दोन्ही पक्षांकडून पाच-सहा जागांची अदलाबदलही होऊ शकते,असे ते म्हणाले. दरम्यान, आपल्याला सुद्धा भाजपची ऑफर होती, पण ती सिरीअस नव्हती, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

पिंपरी-चिंचवडमधील दक्षिण कऱ्हाडचे (जि.सातारा) मूळ रहिवासी असलेल्यांच्या मेळाव्यासाठी चव्हाण आले होते. त्यातून ते उदयनराजे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणुकीत उभे राहणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. दक्षिण कऱ्हाडमधूनच पुन्हा विधानसभा लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यानंतर ते  बोलत होते. यावेळी त्यांनी अवाच्या सव्वा जागांची मागणी हे वंचितचे परिपक्व राजकारणाचे लक्षण नाही, अशी खोचक टीका केली. मात्र,लोकसभेला वंचितचा मोठा फटका बसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे विधानसभेला वंचितला आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. 

पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी एक जागा कॉंग्रेस लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,ती कोणती हे त्यांनी सांगितले नाही. त्यातून आघाडी असतानाचा २००९ चा पॅटर्नच शहरात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेव्हा चिंचवडची जागा कॉंग्रेस, तर भोसरी आणि पिंपरी राष्ट्रवादीने लढविली होती. कॉंग्रेस पराभूत होऊन दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी विजयी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT