Chandrakant Patil 
पुणे

'चंपादाजी' पुण्यात व्हायरल; तुम्ही व्हिडिओ पाहिला का?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्याच्या राजकारणात 'चंपा' शब्दावरून उलट-सुलट वक्तव्ये होत असताना कोथरूडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारात वापरण्यात येत असलेल्या "चंपादाजी' व्हिडीओमुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. शांताबाई या गाण्याच्या चालीवर "चंपादाजी' हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे अन हा तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील नंबर दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येत मनसेचे किशोर शिंदे यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात थेट लढत होत आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीनेही शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे धास्तावलेल्या भाजपने विशेष यंत्रणा येथे लावली आहे. चंद्रकांत पाटील यांना "चंपा' असे भाजपचेच मंत्री म्हणतात, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर तयार झालेल्या "चंपादाजी' व्हिडीओमध्ये चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. तसेच सांगली- कोल्हापूरवरून ते वाहत आले आहेत, कोणी त्यांना तेथे थारा दिलेला नाही, अशा आशयाच्या वक्तव्याला चाल दिली देण्यात आली आहे. हा व्हिडीओ ऐकताना "शांताबाई' गाणं सुरू आहे, असा भास होतो. मनसे आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या बाबत मनसेचे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया म्हणाले, "व्हिडीओ कोणी तयार केला ते माहिती नाही. पण, कोथरूडमधील प्रत्येक मतदारापर्यंत हा व्हिडीओ पाठविण्याचा प्रयत्न सुरू आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil vs Sharangdhar Deshmukh : सत्तेचा सर्वाधिक गैरवापर सतेज पाटील यांनीच केला; बंटी पाटलांचे जुने सहकारी शारंगधर देशमुख यांची टीका

'आम्ही काय तुमच्या घरात येऊन नाचतोय का?' अविनाश नारकरांनी ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाले...

Wardha News: कुटकीत डेंग्यूचा कहर; बालिकेचा मृत्यू ;१५ जणांना लागण, ३०० लोकसंख्येच्या गावात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Latest Marathi News Live Update : पुण्यात इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १९२ जण सुखरूप

Mumbai News: सीएसएमटी पुनर्विकासासाठी १२८ झाडांवर कुऱ्हाड, ५६ झाडे तोडण्यास पालिकेची मंजुरी

SCROLL FOR NEXT