हडपसर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांच्या विजयाची घोषणा होताच, चेतन तुपे यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते.
हडपसर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांच्या विजयाची घोषणा होताच, चेतन तुपे यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते. 
पुणे

भाजपला गुर्मी नडली

ज्ञानेश सावंत

पुणे - राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती आणि वातावरणाचे पडसाद मुंढव्यातील पोटनिवडणुकीत उमटले. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली; मात्र यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाला सणसणीत चपराक बसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. भाजप नेत्यांचा अविर्भाव, गटातटाचे राजकारण आणि ढिसाळ प्रचार यंत्रणेमुळेच या पक्षाला धक्का नव्हे, तर हादरा बसला आहे. या निकालामुळे भाजपविरोधातील असंतोषही दिसून आला. दुसरीकडे, शिवसेनेने मुसंडी मारत, पाच हजारांहून अधिक मते मिळविली. परिणामी, या निवडणुकीने हडपसरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या निवडणुकीत त्यांच्या जाऊ व राष्ट्रवादीच्या उमेदवार पूजा कोद्रे विजयी झाल्या.

शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर सुकन्या गायकवाड यांच्या पारड्यात ४ हजार ३३४ मते पडली. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत गायकवाड यांना ११ हजार ४०० मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या विजयापेक्षा भाजपची मते घटल्याने आगामी निवडणुकांमध्ये या पक्षासाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे. मुंढव्याच्या निकालामुळे आमदार योगेश टिळेकर यांच्यासाठी धक्कादायक असल्याची चर्चा आहे.भाजपला दुसरा क्रमांक टिकविता आला नाही. तसेच भाजप आणि शिवसेनेची मते एकत्र केल्यास तो आकडा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहे. हा आकडा राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठीही इशारा असल्याची चर्चा आहे. येत्या काळात भाजप-शिवसेनेची युती झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही काँग्रेसवर होईल, ही शक्‍यताही नाकारता येत नाही.

भाजपमध्ये गटतट
मुंढवा-मगरपट्‌टासिटीमधील वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीने प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली होती. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धूळ चारून ही जागा ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती होती. परिणामी, या निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता होती. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच होती. गायकवाड यांना गेल्या वेळी संधी दिल्याने अन्य इच्छुकांनी यंदा उमेदवारीची मागणी केली होती. त्यावरून भाजपमध्ये गटतट दिसून आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

SCROLL FOR NEXT