BJP says will send 10 lakh Jai Shri Ram post cards to Sharad Pawar 
पुणे

भाजयुमो आक्रमक; जय श्रीरामचा नारा असलेली दहा लाख पत्रे शरद पवारांना पाठविणार

मंगेश कोळपकर

पुणे : 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रे राज्यातून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविणार आहे. येत्या दोन दिवसांत ही पत्रे पोचतील आणि सोशल मीडियावरही त्याबाबत राळ उठविण्याचे नियोजन भाजयुमोने केले आहे. 

अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या बद्दल टिपण्णी करताना पवार यांनी राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का?, असे म्हटले होते. त्याचा निषेध म्हणून राज्यातील भाजपचे दहा लाख कार्यकर्ते पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पत्रे पाठविणार आहेत, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील भाजयुमोची यंत्रणा कार्यरत झाली आहे. मुंबई, ठाणे परिसरातून या उपक्रमातून सुरवात झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउन असल्यामुळे तेथील येत्या दोन दिवसांत पत्रे जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हा, तालुका आणि गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रावर फक्त जय श्रीराम लिहायचे आहे. कार्यकर्त्याने स्वतःचे नाव टाकून ते पत्र, शरद पवार, 45 सिल्व्हर आेक बंगला, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई 400026 या पत्त्यावर पाठवावे, असे या बाबत भाजयुमोने व्हायरल केलेल्या मेजेसमध्ये म्हटले आहे. 

या बाबत भाजयुमोच्या प्रदेश कार्यालयाने म्हटले आहे की, एका जाणत्या नेत्याने राममंदिराबाबत वादग्रस्त विधान करणे खेदजनक आहे आणि म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या गोष्टीचा निषेध करीत आहोत. समस्त प्रभू रामचंद्र भक्तांच्या भावना यानिमित्ताने तीव्र आहेत आणि म्हणूनच याविरोधात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की,  'जय श्रीराम' लिहिलेली दहा लाख पत्रे शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पाठवावीत. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असंख्य कार्यकर्ते तथा नागरिक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मोठ्या संख्येने पत्र जमा करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांच्याकडे जमा झालेली पत्रे पनवेल येथे पोस्ट ऑफिस मध्ये जमा केली आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शरद पवार हे मोठे सन्माननीय नेते आहेत परंतु प्रभू रामचंद्राच्या विषयात असे नकारात्मक कोणी बोलणार असेल तर प्रभु रामाची आठवण करून देण्याचे काम नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा करत राहील. कोरोना महामारी विषयांमध्ये केंद्रातील सरकार योग्य प्रकारे कार्यवाही करत आहे व संपूर्ण देशात योग्य दिशेने काम सुरू आहे,इतर सर्व राज्यही चांगले काम करीत आहेत परंतु या बाबतीत महाराष्ट्रात मात्र कोठेही सुसूत्रता दिसत नाही. महाराष्ट्र आज कोरोनामध्ये नंबर वन झालेला आहे. आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय दिसत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे, त्यामुळे राम मंदिर बांधल्याने कोरोना जात नाही, तर मग ज्यामुळे करोना जातो अशा किमान चार गोष्टी शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारची शिकवणी घेऊन त्यांना शिकवाव्यात म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण होईल असेही त्यांनी सांगितले. आज आणि उद्या महाराष्ट्रभरात भाजयुमोचे अनेक कार्यकर्ते तथा असंख्य नागरिक ठिकाणी जय श्रीराम लिहिलेली पत्र माननीय शरद पवार यांना पाठवीत असून निषेध व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT