लोगो : पिलीव जि.प. गट
---
PIL26B00894
पिलीव (ता. माळशिरस) : येथे जिल्हा परिषद गटात व गणात विजयी झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पिलीव पेठेतून विजयी मिरवणूक काढली होती. यावेळी सहभागी भाजप कार्यकर्ते.
---
चुरशीच्या लढतीत राम सातपुतेंच्या नेतृत्वाला यश
मोहिते-पाटील अन् जानकर गट एकत्र येऊनही भाजपने रोवला झेंडा
अतुल नष्टे : सकाळ वृत्तसेवा
पिलीव, ता. १४ : माळशिरस तालुक्यातील पिलीव जिल्हा परिषद गटात प्रभावी मानल्या जाणाऱ्या मोहिते- पाटील व जानकर गटांनी एकत्र येऊनही माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निर्णायक विजय मिळविला. चुरशीच्या लढतीत भाजपचे चंद्रकांत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रणजितसिंह जाधव यांचा ६४७ मतांनी पराभव केला.
पिलीव पंचायत समिती गणातून भाजपच्या नम्रता पुकळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यज्ञसेना जहागीरदार यांचा ४२७ मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या पत्नीच्या पराभवामुळे जहागीरदार गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
गेल्या वर्षभरात पिलीव गटात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले होते. त्याचा थेट फायदा या निवडणुकीत झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना मळोली गावातून उमेदवारी मिळाली होती.
गत पंचायत समिती निवडणुकीत रणजितसिंह जाधव यांनी चंद्रकांत जाधव यांचा पराभव केला होता. त्यानंतर चंद्रकांत जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करून यंदा विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलली.
---
तांदूळवाडी गणात राष्ट्रवादीचा विजय
तांदूळवाडी गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मनीषा पाटील यांनी भाजपच्या वैशाली फुलारे यांचा अवघ्या ३० मतांनी पराभव केला. मनीषा पाटील या पिलीवचे माजी सरपंच अमोल मदने-पाटील यांच्या पत्नी असून त्यांना काळमवाडी व फळवणी येथून मोठे मताधिक्य मिळाले.
---
ठळक बाबी
- पिलीव ग्रामपंचायत निवडणुकीतील भविष्यातील समीकरणांवर परिणाम
- तांदूळवाडी गावातून भाजपला मोठे मताधिक्य
- विकास अजेंड्यावर भाजपचा प्रचार प्रभावी
- तांदूळवाडी, पिलीव, मळोली व बचेरी गावांतील मताधिक्याने भाजपचा विजय निश्चित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.