farmers
farmers 
पुणे

भाजपची कर्जमुक्ती म्हणजे 'आधी लुटले; त्यातून परत केले' : अजित नवले

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'शेतकऱ्याच्या उत्पन्नाची लूट होत आली आहे. कर्जमुक्ती म्हणजे त्या लुटलेल्या उत्पन्नातून केलेली अंशतः परतफेड आहे. शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, विषमुक्त शेती महत्वाची ठरणार आहे. भाजपचे दीडपट हमी भाव फसवे ठरले. भाजपच्या कोणत्याही राज्यात हमी भाव मिळालेला नाही. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट वाढवण्याची नीती आयोगाची कल्पना हा एक जुमलाच आहे. प्रक्रिया आणि विक्री या टप्प्यात नफ्याची निर्मिती होते, त्यात शेतकऱ्याला वाटा मिळाला पाहिजे. फक्त आयात -निर्यात धोरणाने काहीही होणार नसल्याचे मत शेतकरी सुकाणू समितीचे सचिव अजित नवले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहानिमित्त 'शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन कधी ? या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवले बोलत होते. 

शेतमालाला रास्त दाम देऊन गरीबाला अन्न देणे, आणि महागाई नियंत्रण करणारे सूत्र स्वामीनाथन आयोगाने सांगीतले आहे, त्याकडे दूर्लक्ष झाले आहे असेही नवले यांनी बोलताना नमुद केले.

गांधीभवन कोथरूड येथे झालेल्या या परिसंवादामध्ये पाशा पटेल (अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग) आणि अध्यक्षस्थानी डॉ.कुमार सप्तर्षी तसेच अप्पा अनारसे, रवी लाटे, सचिन पांडुळे हे संयोजक तसेच संदीप बर्वे सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले,' ४२ वर्ष मी शेती प्रश्नांसाठी झगडत आहे. पदावर असल्याने समर्थनाची भूमिका घेत असलो, तरी आतून माझा संघर्ष सुरु असतो. आयात खाद्यतेलावर ड्यूटी वाढवण्याची मी भूमिका घेतल्याने देश पाच वर्षात स्वयंपूर्ण होणार आहे. माझ्या प्रयत्नांमुळेच राज्या राज्यात कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. मोदी सरकारमुळे डाळी, इथेनॉल, आयात -निर्यात धोरण याबाबत चांगले निर्णय घेतले. मी शेतकरी आहे. दलाल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' यावे, यासाठीच प्रयत्न करीत राहीन'

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, 'देशाचे अन्न स्वावलंबित्व जागतिक संघर्षात महत्वाचे आहे. म्हणून शेतकरी जगवला पाहिजे. शेती हा जीवाभावाचा प्रश्न असल्याने कोणत्याही पक्षाने पोकळ घोषणा करु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT