black magic over small dispute at Picasso Paradise Apartment in Kondhwa crime police action Sakal
पुणे

Pune Crime News : कोंढव्यातील पिकासो पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये किरकोळ वादातून जादूटोण्याचा प्रकार

कोंढव्यातील साळुंखे विहार रस्त्यावरील सह्याद्री पार्कमधील पिकासो पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime News : सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला वैयक्तिक काम सांगितल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून कोंढवा भागात सोसायटीच्या चिटणीसासह मुलाने जादूटोण्याचा प्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सोसायटीतील रहिवाशाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार चिटणीसासह त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोंढव्यातील साळुंखे विहार रस्त्यावरील सह्याद्री पार्कमधील पिकासो पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. चिटणीस राजकुमार जोशी आणि मुलगा अंकुर अशी संशयितांची नावे आहेत. जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये त्यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रूपेश अग्रवाल यांनी फिर्याद दिली.

रूपेश आणि त्यांचे वडील १४ मार्च रोजी सोसायटीतून निघाले होते. त्यावेळी सुरक्षारक्षक जागेवर नव्हता. त्यामुळे अग्रवाल हे जोशी यांच्याकडे गेले. त्यांनी सुरक्षारक्षकाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याला आपली गाडी धुण्यासाठी पाठविल्याचे जोशी यांनी सांगितले. त्यावर अग्रवाल यांनी, ‘सुरक्षारक्षकाला वैयक्तिक काम का सांगता,’ अशी विचारणा केली. त्यावरून वाद झाला. जोशी यांनी अग्रवाल पिता-पुत्राला शिवीगाळ केली.

‘लिंबू ठेवले, काळी बाहुली जाळली’

‘जोशी यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लिंबू ठेवले. त्यांनी काळी बाहुली जाळून धमकावले. त्यांनी असे अघोरी कृत्य केल्याने आमचे कुटुंबीय घाबरले. जोशी यांनी आपला मोठा भाऊ राकेश आणि मामा किशनचंद अग्रवाल यांचा पाठलाग करून दहशत निर्माण केली. यामुळे राकेश यांना हृदयविकाराचा झटका आला,’ असे अग्रवाल यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

SCROLL FOR NEXT