Blood Donor  sakal
पुणे

Pune : रक्तदान शिबीराची ३१ वर्षाची परंपरा

१९९३ पासून दरवर्षी सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - क्रीडापटू असलेल्या चंदन केमकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीराला ३१ वर्षे पूर्ण झाली. १९९३पासून सातत्याने हे रक्तदान शिबीर राबविण्यात येते. चंदन केमकर वयाच्या १५व्या वर्षी ११ एप्रिल १९८७ रोजी उष्माघाताचा बळी ठरला.

त्यानंतर त्याचे प्रशिक्षक असलेले दीपक मेहेंदळे यांनी त्याच्या स्मतिपित्यर्थ रक्ताचा तुटवडा आणि महत्व जाणून घेत या उपक्रमाला सुरवात केली. दरवर्षी एप्रिल महिन्यातील ११ तारखे नंतरच्या कोणत्याही रविवारी मित्रमंडळ चौकातील मित्रमंडळ सभागृहात हे रक्तदान शिबिर घेण्यात येते.

जनकल्याण रक्तपेढी स्वारगेट यांच्या सहकार्याने नुकतेच यंदाचे रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये ८७ जणांनी रक्तदान केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी श्रीराम कुलकर्णी, देवव्रत मेहेंदळे, शौनक मेहेंदळे, अद्वैत लिखिते, सौमित्र मेहेंदळे, पार्थ वैद्य, अश्विन मेहेंदळे, मिताली सुदामे, चंद्रशेखर येरवडेकर यांनी योगदान दिले. या शिबीरासाठी मकरंद गाढवे, सागर खडके यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया

९०च्या दशकात रक्तदान करण्यासाठी पुढे कोणी येत नव्हते. अशा काळात जनजागृती करत घरच्या व्यक्तींनी रक्तदान करण्यास सुरवात करत शिबिर सुरू केले. या शिबिरासाठी कायम मित्रमंडळ सोसायटी सहकार्य करत आली असून त्यांनी मागील ३१ वर्षापासून सभागृहाने कुठलेही शुल्क आकारले नाही. - दिपक मेहेंदळे, संयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT