Boat Capsized in ujani dam sakal
पुणे

Boat Capsized : उजनीत बोट उलटली! सात जण बेपत्ता; पोहत आल्याने पोलिस अधिकारी बचावला

उजनी धरणात सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे प्रवासी वाहतूक करणारी बोट मंगळवारी (ता. २१) सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या वादळामुळे बुडाली.

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर - उजनी धरणात सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे प्रवासी वाहतूक करणारी बोट मंगळवारी (ता. २१) सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या वादळामुळे बुडाली. त्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार ४ पुरुष, दोन महिला व दोन मुलींसह एकूण आठ प्रवासी होते.

त्यापैकी एक जण पोहत कळाशी येथे आला असून, इतर सात जण बेपत्ता झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, अंधारामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे जाण्या-येण्यासाठी उजनी पात्रात बोटीद्वारे वाहतूक केली जाते. मंगळवारी सायंकाळी कुगाव येथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली, असे एकूण ७ प्रवासी आणि बोट चालक एक, असे एकूण ८ जण कळाशीकडे येण्यासाठी बोटीमधून निघाले.

बोट काही अंतरावर पुढे आली असता अचानक जोरदार सुटलेल्या वादळ आणि वळवाच्या पावसाने लाटा निर्माण झाल्याने बोट उलटली, अशी प्राथमिक माहिती आहे. या बोटीत प्रवास करत असलेले सोलापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे हे बोट उलटलेल्या ठिकाणाहून पोहत कळाशीच्या (ता. इंदापूर) किनाऱ्यालगत आले.

दरम्यान, पाणी कमी झाल्याने किनाऱ्यावर गाळ जास्त असल्याने ते रुतून बसले होते. यावेळी स्थानिक नागरिकांच्या ते निदर्शनास आल्याने त्यांनी मदत करीत त्यांना बाहेर काढले. बोटीतील इतर प्रवासी बेपत्ता झाले आहेत.

२०१७ - सोलापूर जिल्ह्यातील काही डॉक्टर उजनी धरणात फिरण्यासाठी आले होते, त्या वेळी बोट उलटून काही डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

२०२२ - मुंबई येथील चार तरुण उजनीकाठच्या गावातील आपल्या नातेवाइकांकडे आल्यानंतर उजनी जलाशयात फिरण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक तरुण पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या एक स्थानिक मच्छीमाराला त्याने घट्ट पकडून धरल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

अंधारामुळे तपासात अडथळे

बोट नक्की कुठे पलटी झाली, याबाबत तपास कार्य सुरू होते. मात्र, अंधार पडल्याने तपास कार्यात अडचण येत होत्या. घटनास्थळी आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी भेट दिली. तसेच, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पोलिस प्रशासन देखील त्या ठिकाणी शोध कार्य करीत आहेत.

भावलीत पाच मृत्युमुखी

इगतपुरी - भावली धरणात (ता. इगतपुरी) मंगळवार सांयकाळी पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. यात तीन मुलींचा समावेश आहे. अनस खान दिलदार खान (वय १७), नाझिया इमरान खान (वय १५), मीजबाह दिलदार खान (वय १६), हनीफ अहमद शेख, वय (२४), ईकरा दिलदार खान (वय १४) अशी मृत मुलांची नावे आहेत.

नाशिकरोड येथील गोसावी वाडीतील एकाच कुटुंबातील सदस्य भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी सुमारास यातील काही मुले-मुली अंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरले. ते बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन जणांनी पाण्यात उड्या मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच पाच जण बुडाले.

स्थानिक आदिवासी तरुणांनी उड्या मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. पाचही जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी धाव मदतकार्य करत हे सर्व मृतदेह इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT