Pune  sakal
पुणे

Pune : पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह ओढापात्रात सापडला

नरेश मस्कु साळवे वय 55 या व्यक्तीचा मृतदेह चौथ्या दिवशी ओढापात्रात सापडला.

चिंतामणी क्षीरसागर

नरेश मस्कु साळवे वय 55 या व्यक्तीचा मृतदेह चौथ्या दिवशी ओढापात्रात सापडला.

वडगाव : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या नरेश मस्कु साळवे वय 55 या व्यक्तीचा मृतदेह चौथ्या दिवशी ओढापात्रात सापडला.

गुरूवार ता. १३ दुपारी बाराच्या दरम्यान बुडल्याचा प्रकार घडला होता. मयत‌ साळवे माळी वस्ती बाजू कडून बाजार तळाकडे निघाले असता ओढ्यावरील छोट्या पुलावरून चालत येताना वेगवान प्रवाहामुळे पाय घसरून ओढापात्रात वाहून गेले थोडे अंतर पोहल्यावर दमछाक होऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान गेले दोन दिवस वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि गावातील तरुण मंडळाच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. पण यात यश आले नाही. सदर घटनेबाबत जिल्हा आपत्ती समिती यांच्याकडे मदत मागण्यात आली बारामती येथे ठेवण्यात आलेल्या बोट उपलब्ध करून देण्यात आल्या. राष्ट्रवादी आपत्ती व्यवस्थापन सेल

आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र यांचे पथक शनिवार ता. १५ सायंकाळी दाखल झाले रात्री उशीर झाल्यामुळे पाण्यात शोध घेता आला नाही सकाळी साडेसातच्या दरम्यान पथकातील संतोष शेलार, करिम सय्यद, सागर जाबरे संदीप गव्हाणे, निलेश कुसाळकर, दिलीप गायकवाड, मनोज साळवे यांनी शोध मोहीम सुरू केली बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर काटेरी झुडपात मृतदेह आढळून आला.

ओढा पात्रातून मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यानच्या कालावधीत प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे तहसीलदार विजय पाटील पाटबंधारे उप अभियंता प्रवीण घोरपडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

चंद्रपूर मनपामध्ये अविश्वासाचे ढग, भाजपातील अंतर्गत वाद चिघळणार; संख्याबळाचे समीकरण गुंतागुंतीचे

महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; राज्यात ३५ हजार ८७६ पदांची भर, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

सावकारने किडनी विकलेल्या चंद्रपुरातील शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी, न्यायासाठी रोशन कुडेंची पायपीट सुरूच...

Lamangaon-Takli leopard scare: लामणगाव-टाकळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप

SCROLL FOR NEXT