dead_body 
पुणे

नदीच्या पाण्यासोबत वाहत आलेली गोष्ट पाहून नागरिकांना बसला धक्का  

दत्ता कदम

मांडवगण फराटा (पुणे) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे भीमा नदीच्या पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. भीमा नदीत पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहत आला असावा, असा अंदाज आहे.

याबाबतचा खबरी जबाब मांडवगणचे पोलिस पाटील गंगाधर भाऊसाहेब फराटे यांनी दिला आहे. आज (ता. २) सकाळी ७.३० वाजता मांडवगण फराटा येथे भीमा नदीच्या पुलाच्या पूर्व बाजूला योगेश शिवाजी फराटे यांच्या शेताजवळ भीमा नदीच्या पात्राच्या कडेला एक अनोळखी अंदाजे ४० ते ४२ वयाच्या महिलेचे पूर्ण सडलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला आहे. या महिलेच्या  अंगावर लाल रंगाचा ब्लाऊज व त्यावर काळ्या रंगाची पट्टी असून, गुलाबी रंगाचा परकर आहे. त्याला निळ्या रंगाची नाडी आहे. गळ्यात काळ्या रंगाचे मण्याची पोत आहे. त्यामध्ये धातूच्या दोन वाट्या आहेत. तसेच, हातात हिरव्या मोरपंखी बांगड्या आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास तत्काळ शिरुर पोलीस स्टेशन (०२१३८-२२२१३९) किंवा मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्राशी (०२१३७-२६२१३३) संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलिस चौकीचे पोलिस हवालदार श्रावण गुपचे, पोलिस कॉन्स्टेबल किरण ढुके, योगेश गुंड, अक्षय काळे हे करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलच्या सीटवर महिला झोपली, पुरुष प्रवाशाला राग अनावर; शिवीगाळ करत पट्टा काढला अन्...; Video Viral

Investment: भारतातील उद्योजक कुटुंबांसाठी 'फॅमिली ऑफिस' हेच संपत्ती व्यवस्थापनाचे पसंतीचे मॉडेल का बनत आहे?

Land Measurement: जमीन मोजणीच्या नोटिसा आता ऑनलाइन! ‘आपली चावडी’वर मिळणार माहिती, स्पीड पोस्टने घरपोच नोटीस

प्रत्येक विद्यार्थ्याने पाहावा असा! कसा आहे 'आर्यभट्ट का झिरो'? वाचूनच ठरवा प्लॅन!

Marathi News Live Updates : अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर भडकले

SCROLL FOR NEXT