Arrested Sakal
पुणे

तोतया पोलिस निरीक्षकाला गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

मुंबईत पोलीस निरीक्षक म्हणून असल्याची बतावणी करून पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये राहणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुंबईत पोलीस निरीक्षक (Police Inspector) म्हणून असल्याची बतावणी करून पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये राहणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास (Criminal) गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक (Arrested) केली. आरोपीविरुद्ध मुंबई पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे (Crime) दाखल आहेत.

पवन ऊर्फ मिलींद हरिषचंद्र सावंत (वय 37, रा. गावदेवी, डोंबिवली, ठाणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात "ऑपरेशन ऑल आऊट' अंतर्गत कारवाई सुरू आहे. गुन्हे शाखेचे पथक स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभुमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये एक तोतया पोलिस अधिकारी राहात असल्याची माहिती युनीट चारच्या पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून लॉजवर छापा टाकला. त्याठिकाणी पोलिसांना तेथे पवन सावंत आढळून आला. त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी तो सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. मुंबईतील काही पोलीस ठाण्यात पवन विरूद्ध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, तो तो पुण्यात कशासाठी आला होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हि कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT