बूस्टर डोसचा निर्णय देशपातळीवर व्हावा esakal
पुणे

बूस्टर डोसचा निर्णय देशपातळीवर व्हावा

पुणे जिल्ह्यातील ३३ टक्के नागरिकांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील ३३ टक्के नागरिकांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही, ही गंभीर बाब आहे. येत्या आठवडाभरात दोन्ही डोस पुर्ण करा. अन्यथा कठोर निर्णय घ्यावा लागेल, अशी तंबी पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१०) अद्याप कोरोनाचे दोन्ही डोस न घेतलेल्या पुणेकरांना दिली. पुणे जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे दोन्ही डोस पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरीत नियोजन करावे आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असा आदेश पालकमंत्री पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिला.

पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा तंबी दिली आहे. पवार म्हणाले, " पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण झाला आहे. मात्र, दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही, असे दिसून आले आहे. आतापर्यंत ६७ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, उर्वरित ३३ टक्के नागरिक दुसऱ्या डोस पासून लांब आहेत. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या समाधानकारक नाही. सर्व तज्ज्ञांच्या मते दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या आठवड्यात दुसर्‍या डोसला प्रतिसाद दिला नाही, तर पुढील आठवड्यातील बैठकीत वेगळा निर्णय घ्यावा लागेल."

पवार म्हणाले‌, "ओमयक्रॉनबद्दल सध्या चर्चा सुरू आहे, त्याचा आढावा घेत आहोत. ओमयक्रॉनच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. दोन डोस घेतलेल्याना ओमयक्रॉनची भीती नसते आणि त्यामुळे दोन्ही डोस घेतले पाहिजेत. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ७ पैकी ५ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. बाहेरच्या देशातून आलेल्या आणखी लोकांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे."

'बूस्टर डोसचा निर्णय देशपातळीवर व्हावा' राज्यात ओमयक्रॉनचे रुग्ण सापडल्याने शाळा चालू ठेवायच्या की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत संभाव्य अंदाज घेऊन निर्णय घेऊ. राज्य स्तरावर हा निर्णय घेण्यात येईल. बूस्टर डोसबाबत आताच काही बोलणे योग्य नाही. आधी दोन्ही डोस पूर्ण करून त्यानंतर बुस्टर डोसचा विचार केला जाईल. बूस्टर डोसचा निर्णय देशाच्या पातळीवर झाला पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT