Booster doses available at 68 centers in pune city from today  sakal
पुणे

पुणे : शहरातील ६८ केंद्रांवर आजपासून मिळणार बुस्टर डोस

महापालिकेचे रुग्णालय, दवाखाने या ६८ ठिकाणी कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशील्ड या दोन्ही लसीचे डोस उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्र शासनाने १८ वयाच्या पुढील सर्व नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे महापालिकेने आजपासून बूस्टर डोस देण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेचे रुग्णालय, दवाखाने या ६८ ठिकाणी कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशील्ड या दोन्ही लसीचे डोस उपलब्ध आहेत.

शासनाने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे पहिले दोन डोस मोफत उपलब्ध करून दिले, त्यानंतर बूस्टर डोस हा खासगी रुग्णालयांमधून सशुल्क घ्यावा लागत होता. त्यामुळे बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने बूस्टर डोसचे लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत महापालिकेला आदेश प्राप्त झाल्याने १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील महापालिकेचे रुग्णालय व दवाखान्यात लसीकरणाचे नियोजन केले आहे.

बूस्टर डोस कोणासाठी ?

- १८ वर्षांपुढील नागरिक ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत.

- ज्या नागरिकांना दुसरा डोस घेऊन ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत.

- ज्यांना तीन महिन्यात कोरोना झालेला नाही असे नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

SCROLL FOR NEXT