pune crime Esakal
पुणे

Pune News: आरोपींना शोधण्यासाठी २५ पथके; संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद

Pune News: बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याच्या धाकाने सामुहिक बलात्कार करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी २५ पथके तयार केली आहेत.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पुणे: बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याच्या धाकाने सामुहिक बलात्कार करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी २५ पथके तयार केली आहेत.

संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्याआधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच तरुणीने दिलेल्या माहितीनुसार आरोपींचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.

तरुणी आणि तिच्या मित्राला आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. बलात्कारापूर्वी आरोपींनी तरुणी आणि तिच्या मित्राकडील ऐवज लूटल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कोंढव्यातील टेबल पॉइंट परिसरात गुरुवारी (ता. ३) रात्री हा प्रकार घडला. तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले असता तरुणी आणि तिच्या मित्राला आरोपींनी कोयत्याचा धाक दाखविला होता.

ग्रामीण पोलिसांकडून पोलिसांना तपासात सहाय केले जात आहे. बोपदेव घाट निर्जन आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच तांत्रिक अडचणींमुळे मोबाईल विश्लेषण करण्यात येत अडथळे येत आहेत. बलात्कार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेले आहेत. सासवडकडे जात असताना संशयित आरोपींचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना उपलब्ध झाले आहे. आरोपींविषयी काही माहिती असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. करण्यात आले आहे. आरोपी ज्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.

बोपदेव घाटात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरु करण्यात यावी - डॉ. नीलम गोऱ्हे

महिला, शाळकरी मुलींवर होणारे अत्याचारांची प्रकरणे फक्त पोलिसांपुरती मर्यादित नाही. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, अशी भावना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. महिला, तसेच शाळकरी मुलींवर अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी शनिवारी पोलिस आयुक्तालयात बैठक घेतली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. बोपदेव घाटात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरु करण्यात यावी. तसेच बोपदेव घाटासह दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसरात पोलिसांनी नियमित गस्त घालावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT