Suicide Sakal
पुणे

फायनान्स कंपनीने अश्‍लील फोटो व शिवीगाळ असलेले मेसेज व्हायरल केल्याने कर्जदाराची आत्महत्या

फायनान्स कंपनीने अश्‍लील फोटो व शिवीगाळ असलेले मेसेज व्हायरल केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

फायनान्स कंपनीने अश्‍लील फोटो व शिवीगाळ असलेले मेसेज व्हायरल केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - फायनान्स कंपनीने (Finance Company) अश्‍लील फोटो (Obscene Photos) व शिवीगाळ असलेले मेसेज (Message) व्हायरल केल्याने तरुणाने आत्महत्या (Youth Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेसेज व्हायरल करणारी फायनान्स कंपनी आणि त्यातील कर्मचाऱ्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

अनुग्रह ए. पी. प्रकाशन (वय २२, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता, मुळ रा. केरळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत नाईजिल राजन मटानकोट (वय ३३, रा. आयटी रस्ता, औंध, मुळ रा. केरळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आसान लोन कंपनी आणि तिच्या कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ते २७ जानेवारीदरम्यान सिंहगड रस्ता परिसरात हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फायनान्स कंपनीतून प्रकाशन यांना फोन आला व तुमच्या आईने आठ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याचे हप्ते भरण्यात आले नाही.

तसेच मुद्दल परत करण्यात आली नाही, असे सांगत त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर फायनान्स कंपनीतील एका कर्मचाऱ्याने प्रकाशन यांचे अश्‍लील फोटो व शिवीगाळ असलेले मेसेज त्यांचे नातेवार्इक, मित्र आणि सहकारी यांना पाठवून व्हायरल केले. त्यामुळे बदनामी झाल्यामुळे प्रकाशन यांनी आत्महत्या केली. या गुन्ह्याचा तपास सिंहगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

SCROLL FOR NEXT