Madhav Bhandari  sakal
पुणे

Madhav Bhandari : भ्रष्टाचाराच्या बाबतीत दोन्ही कॉंग्रेस सारख्याच; माधव भांडारी यांचा आरोप

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही कॉंग्रेस भ्रष्टाचाराच्या बाबतीत सारख्याच आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही कॉंग्रेस भ्रष्टाचाराच्या बाबतीत सारख्याच आहेत. मुळात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा कॉंग्रेसमधून फुटून बाहेर पडल्यानंतरच जन्माला आलेला पक्ष आहे. त्यामुळे या दोन्ही काँग्रेस भ्रष्टाचार,कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबटलेल्या आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शनिवारी (ता.९) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला.

भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सुमारे तीनशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. त्यांच्याकडे एवढी मोठी मालमत्ता सापडल्यानंतरही काँग्रेसने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे साहू यांच्या या बेहिशोबी मालमत्तेचा सर्वोच्च नेतृत्वाशी संबंध आहे का, अशी शंका निर्माण झाल्याचे मत भांडारी यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यात सध्या भाजपचा मित्र असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे (अजित पवार गट) माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता भांडारी यांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या घरी सुमारे तीनशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे.

ही संपत्ती मोजताना, मशिनही बंद पडल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे सापडूनही काँग्रेस पक्षाकडून साहू यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. साहू यांचा दारूचा व्यवसाय आहे. तरीसुद्धा काँग्रेसकडून त्यांना खासदारकी दिली जाते. साहू हे राहुल गांधी यांच्या जवळचे असल्याने, ते तीन वेळा खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संबंध आहे का, असा प्रश्‍न पडतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT