SUICIDE
SUICIDE 
पुणे

मालकाच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

शिरोली : मालकाच्या सततच्या त्रासाला व धमक्‍यांना घाबरून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सायगाव (ता. खेड) येथे घडली. रामदास महादू खंडवे (वय 32, रा. तळ्याची ठाकरवाडी, सायगाव) असे या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत त्याचा चुलतभाऊ पप्पू सहादू खंडवे यांनी खेड पोलिस ठाण्यात नवनाथ अशोक गायकवाड याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार रामदास हा गायकवाड यांच्या वडगाव पाटोळे (ता. खेड) येथील फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये वेल्डर म्हणून 2 वर्षांपासून काम करत होता. तेथे रामदास व गायकवाड यांच्यात कायम वाद होत होते. रामदास कामावर न आल्यास गायकवाड त्याला मारहाण व दमदाटी करत असे. "तू कामावर न आल्यास तुझी मुले घेऊन जाईल' अशी तो रामदास याला धमकी द्यायचा. तो त्याला वेळेवर पगार देत नसे. त्यामुळे रामदास कायम तणावात असे.

15 नोव्हेंबर रोजी रामदास दुपारीच कामावरून घरी आला तेव्हा गायकवाड याने पुन्हा घरी येऊन त्यास मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी सकाळी कामावर गेलेला रामदास घरी परतला नाही. त्याचा शोध घेतल्यानंतर सोमवारी (ता. 18) रात्री त्याच्या राहत्या घरी पडवीमध्ये लाकडी वाशाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृत्यूपूर्वी "मालकामुळे मी आत्महत्या करीत आहे' असे रामदासने पडवीमध्ये असलेल्या काचेवर लिहून ठेवले होते.

रामदास याच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन मुले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बडाख तपास करीत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT