Khadakwasala Canal sakal
पुणे

Khadakwasla Canal : खडकवासला कालव्यात मुलगा बुडाला; आठवड्यातील दुसरी घटना

खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यात तोंड धुण्यासाठी उतरलेला मुलगा बुडाल्याची घटना घडली.

निलेश बोरुडे

किरकटवाडी - खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यात तोंड धुण्यासाठी उतरलेला मुलगा बुडाल्याची घटना घडली असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.

शाहिद अल्लाउद्दिन बरोटे (वय 16, रा. येरवडा) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. मागील आठवड्यात याच ठिकाणी जुबेर इस्माईल शेख (वय 26, भवानी पेठ पुणे) याचा बुडून मृत्यू झाला होता. सातत्याने अशा घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाहिद बरोटे हा मुलगा त्याच्या इतर मित्रांसह सकाळी सिंहगडावर गेला होता. परत येताना ऊन असल्याने चौघेही खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्याजवळ तोंड धुण्यासाठी थांबले. चौघेही कालव्याच्या कडेला तोंड धूत असताना शाहिदचा पाय घसरला व तो खोल पाण्यात गेला. पाण्याला वेग असल्याने काही क्षणांतच तो दिसेनासा झाला.

सोबत असलेल्या इतर तिघांनी आरडाओरड केल्यानंतर इतर लोक मदतीसाठी धावले. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शरद चव्हाण व होमगार्ड अनिकेत चोरघे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर काळभोर, सुरज माने, योगेश मायनाळे,पंकज माळी, अक्षय तांबे हे जवान शाहिदचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : पुण्यात गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते वाहतुकीस राहणार बंद; पर्यायी मार्गांविषयी जाणून घ्या

MLA Shashikant Shinde: प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय: आमदार शशिकांत शिंदे; सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी जागरूक राहावे

Satara Teachers Bank: 'सातारा शिक्षक बॅंकेची १५ मिनिटांत गुंडाळली वार्षिक सभा'; गैरकारभार, नोकर भरती आदी मुद्द्यांवरून घोषणाबाजी

चेतेश्वर पुजाराची काल निवृत्ती अन् आज दुसऱ्या खेळाडूने माफी मागून मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; देशासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज...

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT