murder.jpg
murder.jpg 
पुणे

प्रेयसीचा ब्लेडने वार करून खून; प्रियकर फरार

सकाळ वृत्तसेवा

प्रेयसीचा ब्लेडने वार करून खून;प्रियकर पसार

पुणे : प्रेम प्रकरणातून अल्पवयीन प्रेयसीची हत्या करुन प्रियकर पसार झाला आहे. पुणे जिल्ह्यात मावळमधील वडगाव एमआयडीसी रोडवर असलेल्या लॉजवर हा धक्कादायक प्रकार घडला.

विशाल लॉन्सजवळ असलेल्या ‘निसर्गवारा स्पॉट ऑन’ लॉजवर बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास एक जोडपं आलं. ते जोडपे लॉजमधील रुम नंबर 303 मध्ये थांबलं होतं. काही कारणाने झालेल्या वादातून जोडप्यातील तरुणाने तरुणीच्या गळ्यावर, हातावर आणि पोटावर ब्लेडने वार केले, यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी श्रीराम गिरी लॉजमधून पळून गेला. मृत तरुणी अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे.

मावळमध्ये असलेला ‘निसर्गवारा स्पॉट ऑन’ हा लॉज भाजप पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती आहे. गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर आणलं आणि तिच्यावर अत्याचार केले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आरोपीच्या शोधात पुणे ग्रामीण पोलिसांची सहा पथकं रवाना करण्यात आली आहेत. लॉजवरही कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सूचित केलं. तरुणी अल्पवयीन असताना तिला एका तरुणासोबत लॉजमध्ये जाऊ कसं दिलं, आयकार्ड तपासलं नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT