पुणे

श्रीकंवरबाई लोढा यांच्या स्मरणार्थ मेंदू विकार तपासणी शिबिर

CD

जाहिरात विभागाची बातमी
----------------
PNE26W42373
अहिल्यानगर ः जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे स्व. श्रीमती श्रीकंवरबाई नारायणदास लोढा यांच्या स्मरणार्थ मेंदू विकार तपासणी शिबिराचे उदघाटन उद्योजक सतीश लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

-------------------
रुग्णांना उपचार मिळवून देणे हिच मानवसेवा ः सतीश लोढा
श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मेंदू विकार तपासणी शिबिर
अहिल्यानगर, ता. १४ : आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांनी संपूर्ण जीवन मानवसेवा, अहिंसा, त्याग आणि करुणेचा संदेश देण्यासाठी समर्पित केले. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये याच शिकवणीने काम सुरू आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना आधुनिक वैद्यकीय हिच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन उद्योजक सतीश लोढा यांनी केले.
जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आचार्य श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या १२६व्या जन्मदिनानिमित्त व दिवंगत श्रीकंवरबाई नारायणदास लोढा यांच्या स्मरणार्थ आणि सतीश व संजयकुमार लोढा परिवार यांच्या वतीने मेंदू विकार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक सतीश लोढा यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. संजयकुमार लोढा, उज्ज्वला लोढा, सुनीता लोढा, सुमित लोढा, भाग्यश्री लोढा, कुणाल लोढा, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, माणकचंद कटारिया, गणेश कांकरिया, वसंत चोपडा, प्रेक्षा लोढा, तज्ज्ञ डॉ. अद्वैत गिते, डॉ. वैशाली कदम, डॉ. स्नेहा म्हस्के आदी उपस्थित होते.
डॉ. अद्वैत गिते म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाचे सीटी स्कॅन, तसेच एमआरआय मशीन उपलब्ध असून मेंदू आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यासाठी या आधुनिक यंत्रसामग्रीचा उपयोग केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजाराचे स्वरूप समजून घेऊन उपचाराची योग्य दिशा निश्चित करण्यास डॉक्टरांना मदत होते. त्यामुळे रुग्णांनी आजाराची लक्षणे जाणवल्यास उपचार पुढे ढकलू नयेत आणि उपलब्ध आधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. माणकचंद कटारिया यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

Marathi News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीतील 'बारापुल्ला फेज-३' कॉरिडॉरचे उद्घाटन

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT