Wedding_Divorce 
पुणे

दोघेही कॉम्प्युटर इंजिनिअर; साखरपुडा मोडला आणि त्याने...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुलगा परदेशात संगणक अभियंता, तर मुलगीही संगणक अभियंता. कुटुंबाच्या पुढाकाराने दोघांचेही लग्न जमले, त्यांचा साखरपुडाही झाला, पण काही कारणाने त्यांचे लग्न मोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या संगणक अभियंत्याने तरुणीचे फेसबुक अकाऊंट हॅक करून तसेच अन्य सोशल मीडियावर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरूवात केली. अखेर तरुणीने पोलिस ठाणे गाठले, पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य ओळखत संगणक अभियंत्याला अटक करून चांगलाच पोलिसी खाक्‍या दाखविला! 

आदेश बोरा (रा.कात्रज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही संगणक अभियंता आहे, तर आदेश हा देखील संगणक अभियंता असून तो परदेशामध्ये एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. लग्न करण्यासाठी तो पुण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी तरुणी आणि आदेशचे लग्न जुळले होते. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सारखरपुडाही उरकला होता. दरम्यान, काही कारणामुळे फिर्यादी आणि तिच्या कुटुंबीयांनी हे लग्न मोडले. 

दरम्यान, लग्न मोडल्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने ईमेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, पिन्टरेस्ट यासारख्या सोशल मीडियावर तरुणीच्या नावाने बनावट खाती उघडली. त्याद्वारे त्याने फिर्यादी तरुणी, तिचे कुटुंबीय आणि मित्रांना त्रास देण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर त्याने तरुणीचे फेसबुक खातेही हॅक केले होते. या सगळ्या प्रकाराचा तरुणीला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सुरू होता. या प्रकारास कंटाळून फिर्यादीने थेट पोलिस भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठले. तेथे फिर्याद दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT