पुणे

उद्योग बॅंक व्याख्यानमाला

CD

PNE26W51499
प्रा. अजित अभ्यंकर.

ब्रिक्स परिषदेत भारताची ताकद सिद्ध
प्रा. अजित अभ्यंकर; गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमाला

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० ः दिल्लीत झालेल्या ब्रिक्स परिषदेत भारताने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. भारताने एखादा निर्णय घेतला तर जगाला त्याचा विचार करावा लागतो, हे ब्रिक्स परिषदेतून स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्रा. अजित अभ्यंकर (पुणे) यांनी केले.
येथील फडकुले सभागृहात आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत ‘युद्ध : जग आणि नवी समीकरणे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्याख्यानमाला समितीचे प्रेसिडेंट यल्लादास लचमापुरे, अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, प्रभारी अध्यक्ष श्रीनिवास बिंगी, विद्यमान सचिव श्रीनिवास नंदाल, श्रीनिवास सामलेटी, व्यंकटेश बिटला, अंबादास गड्डम आदी उपस्थित होते. ते म्हणाले, भारत आपल्या गरजेच्या सुमारे ८० टक्के तेलाची आयात करतो. त्यापैकी ४० ते ५१ टक्के तेल रशियाकडून खरेदी केले जाते. या व्यवहारात डॉलरऐवजी रुपया आणि रुबलचा वापर केला जात आहे. डॉलर हे अमेरिकेचे आर्थिक शस्त्र असून, अमेरिकेची ताकद तेथील बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच शस्त्रनिर्मिती करणाऱ्या मोठ्या उद्योगसमूहांमध्ये आहे.
जागतिक व्यापारातील ३५ लाख कोटी डॉलरच्या व्यवहारांपैकी सात लाख कोटी डॉलरचा व्यापार अमेरिकेचा आहे. म्हणजेच जागतिक व्यापारातील सुमारे २२ टक्के हिस्सा अमेरिकेचा आहे. परकीय चलनाच्या व्यवहारांपैकी सुमारे ८० टक्के व्यवहार डॉलरमध्ये होतात, तर जागतिक परकीय चलन साठ्यातील १२ लाख कोटींपैकी सात लाख कोटी डॉलरचा साठा डॉलरमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. जगातील १८० पेक्षा अधिक देश डॉलरचा साठा ठेवतात आणि त्याद्वारे व्यवहार करतात. व्यंकटेश मेरगू यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल वंगा यांनी केले. तर आभार गोवर्धन चव्हाण यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT