Brother attack on his  brother and nephew in pune for Filed complaint for small disputes
Brother attack on his brother and nephew in pune for Filed complaint for small disputes 
पुणे

सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी: भावावरच केला खुनी हल्ला

सकाळवृत्तसेवा

हिंजवडी : किरकोळ भांडणाची तक्रार पोलिसांकडे केल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावावर तसेच पुतण्यावर खुनी हल्ला केला. सूस (ता. मुळशी) येथील ननवरे वस्तीवर रविवारी (ता. 23) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्यात रशिकांत कचरे व त्यांचा मुलगा तुषार गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. टीना रशिकांत कचरे यांनी फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

या प्रकरणी शशिकांत कचरे, विकास कचरे, राखी कचरे, चैताली विकी कचरे, कामिनी धुमाळे, सोन्या व महिंद्र (यांची पूर्ण नावे माहिती नाहीत) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अजित पवारांशी घेतलेला पंगा अनिल भोसलेंच्या अंगाशी?

पोलिस उपनिरीक्षक मीनानाथ वरुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी तुषार व आरोपी विकास व शशिकांत यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्याची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून तलवार व कुऱ्हाडीने तुषार व रशिकांत यांच्यावर वार केले. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT