Bug sniffer is a fast bacterial detection device is developed by Agharkar Research Institute
Bug sniffer is a fast bacterial detection device is developed by Agharkar Research Institute 
पुणे

'बग स्निफर': वेगाने बॅक्टेरिया शोध घेणारे यंंत्र ; पुण्यातील 'या' स्ंस्थेने केली निर्मिती

सकाळवृत्तसेवा

पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील (एआरआई) संशोधकांनी वेगाने जिवाणूंचा (बॅक्टेरिया) शोध घेणाऱ्या यंत्रणाची निर्मिती केली आहे. कमी खर्चाच्या या संवेदनशील 'बायोसेन्सर'ला संशोधन प्रमुख डॉ. धनंजय बोडस यांनी 'बग स्निफर' असे नाव दिले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हे बायोसेन्सर, मिक्रोचॅनेल, कृत्रिम (सिंथेटिक) 'पेप्टाईड्स', मॅग्नेटिक नॅनोपार्टिकल्स आणि 'क्वांटम डॉट'च्या साहाय्याने कमी वेळेत पाणी व अन्नमधून निर्माण होणाऱ्या जिवाणूंचा शोध लावणे सोपे झाले आहे. यासाठी संशोधकांनी तांब्याच्या तारा आणि सिलिकॉन पॉलिमर वापरून बनलेली सूक्ष्म वाहिन्या असलेली एक चीप बनवली आहे. सध्या वापरण्यात येत असलेली पारंपरिक जंतू शोधण्याची प्रक्रिया कमी संवेदनशील असून यामुळे कमी संख्येने जिवाणूंचा शोध घेतला जातो. तसेच यासाठी वेळही खूप लागतो. दरम्यान एआरआईने विकसित केलेल्या या सेन्सरमुळे कमी वेळेत अधिकाधिक जीवाणूंना शोधणे शक्य असल्याचे, डॉ. धनंजय बोडस यांनी सांगितले.
पुण्यात गोंधळ; कोरोनाबाधित आणि तपासणीला आलेले एकाच ठिकाणी

डॉ. बोडस म्हणाले, "या यंत्रणात असलेल्या सिंथेटिक पेप्टाईडमुळे सर्वसाधारण रोगांचे कारण आलेल्या 'एशेरिचिया कोलाय' (ई कोलाय) व 'सॅल्मोनेला टायफीम्युरियम' जीवाणूंना एकाच वेळी शोधणे सोपे झाले आहे. त्यामुळे तपशीलवारपणे या जीवाणूंचे अभ्यास करणे व त्यांचे अस्तित्व सिद्ध करता येते.

फ्लूची लक्षण आहेत? घाबरू नका, पिंपरीत पालिकेनं केलीय सोय!
एलएएमपी (लूप मेडियेटेड आयओथर्मल ऍम्प्लिफिकेशन) या तंत्रज्ञानाचा वापर करून 'ई कोलाय' आणि 'सॅल्मोनेला टायफिमिरीयम' या जीवाणूंना एकाच वेळी शोधून त्यांना वेगळे करण्यावर संशोधन सुरू आल्याचे डॉ. बोडस यांनी सांगितले.

"बग स्निफर या अत्यंत संवेदनशील बायोसेन्सरला तयार करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानासह मायक्रोफ्लूइडिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. नॅनोबायोसेन्सर व त्या संदर्भातल्या संशोधनाने जीवाणूरोगनिदान क्षेत्रात त्वरित परीणाम सांगणाऱ्या आणि चीपद्वारा करता येणाऱ्या चाचण्यांच्या संशोधनाला सुरुवात करणे शक्य झाले आहे. बग स्निफरला शहराच्या पाण्याच्या वितरणामध्ये बॅक्टेरियाची संख्या मोजण्यासाठी एक 'इन-लाइन मॉनिटरिंग सिस्टम' म्हणून वापरली जाऊ शकते. तसेच घरात असलेल्या वॉटर प्युरिफायर सिस्टममध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो."
- डॉ. धनंजय बोडस, वैज्ञानिक - आघारकर संशोधन संस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाची बारामतीला भेट; वाचा काय घडलं?

बग स्निफेरचे वैशिष्ट्य
- या यंत्राच्या मदतीने 30 मिनिटात 1 मिलीलिटर  नमुन्यातुन  10 जिवाणू पेशी ओळखणे शक्य
- हे यंत्र बनविण्यासाठीचे संसाधन सहज उपलब्ध होतात
- पारंपरिक यंत्रणांच्या तुलनेत या यंत्राचा खर्च कमी 
- सिंथेटिक पेप्टाईड्समुळे कोणत्याही 'क्ष' पदार्थाचा जीवाणूंवर रासायनिक परिणाम होत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT