damage forest assets in Sinhagad fort area burn Failure to take preventive action
damage forest assets in Sinhagad fort area burn Failure to take preventive action  sakal
पुणे

Pune News : सिंहगड परिसरातील वन संपत्तीची राखरांगोळी; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अपयश

निलेश बोरुडे

सिंहगड : मागील काही दिवसांपासून सिंहगड किल्ला व आजूबाजूच्या परिसरातील वन संपत्तीची राखरांगोळी होत आहे. शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक होत असून वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असताना अद्याप वन विभागाने आगीच्या घटना रोखण्यासाठी 'कागदी घोडे' नाचविण्याच्या पलिकडे ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या नाहीत. परिणामी वन, प्राणी, पक्षी व इतर वन्यजीवांची अपरिमित हानी होताना दिसत आहे.

सिंहगड किल्ल्याच्या डोंगरकपारीत सध्या मोठ्या प्रमाणात आग भडकलेली असून परिसरात धूराचे लोट दिसून येत आहेत. आतापर्यंत शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले असून आगीचा विध्वंस सुरुच आहे.

दरवर्षी अशाप्रकारे आग लागून वनक्षेत्रातील झाडेझुडपे, प्राणी,पक्षी व इतर वन्यजीव नष्ट होतात. 'वनवा' लागला असे म्हणत वन विभाग शक्य तेवढी आग वाझविण्याचा प्रयत्न करतो मात्र समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक लावल्या जात असलेल्या या आगीला प्रतिबिंब करण्यासाठी अद्याप कधीही परिणामकारक उपाययोजना वन विभागाने केलेल्या नाहीत.

परिणामी सिंहगड, डोणजे, खडकवासला, नांदोशीसणसनगर,धायरी, गोऱ्हे खुर्द, मणेरवाडी व आजूबाजूच्या इतर गावांमध्ये दिवसेंदिवस वन संपत्तीची होरपळ सुरू आहे.

आगीची कारणे ......

•खोडसाळपणे गवत पेटवून देणे‌.

•शेतकऱ्यांकडून शेताचे बांध जाळताना आग पसरणे.

•शिकारीसाठी आग लावणे.

•पुढच्या वर्षी चांगले गवत उगते असा गैरसमज असल्याने जंगल पेटवून देणे.

"मागील काही दिवसांपासून सिंहगड परिसरात आगीच्या घटना सुरू झाल्या असून वनस्पती ,प्राणी,पक्षी उध्वस्त होत आहेत. दरवर्षी असे होत आहे परंतु वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तीव्र डोंगर उतार व घनदाट जंगल असल्याने आग लागल्यानंतर विझविणे अशक्य आहे, त्यामुळे वन विभागाने अगोदरच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे."

- पांडुरंग सुपेकर, रहिवासी, घेरा सिंहगड

"शक्य त्या ठिकाणी जाळरेषा काढून जंगलातील आगीला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या वन समितीचे तीस कर्मचारी आग नियंत्रणासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. आग लावणारांची माहिती आम्ही काढत असून पाचगाव येथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी काही माहिती मिळाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुपीत ठेवण्यात येईल व योग्य बक्षिसही देण्यात येईल."

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT