Bus 
पुणे

बसचे पिकअप पॉइंट लालफितीत

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात खासगी बसच्या प्रवाशांची रोजची संख्या ६४  हजारांपेक्षा जास्त असली, तरी या बसना  पिकअप पॉइंट नाहीत. त्यामुळे प्रवासी घेण्या-सोडण्यासाठी त्या रस्त्यावरच उभ्या राहतात. परिणामी, त्याचा वाहतुकीला अडथळा होऊन कोंडीत भर पडत आहे.

स्थानकासाठी जागा आणि प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी पिकअप पॉइंट्‌स मिळावेत, ही खासगी बसमालक-चालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.

राज्य सरकारने याबाबत अध्यादेश काढून महापालिकांना आदेशही दिले आहेत; परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही. जकात रद्द झाल्यावर चारही दिशांच्या जकात नाक्‍यांच्या जागा भाडेतत्त्वावर मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली होती. वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पाहणीही केली; परंतु त्यावर महापालिकेत निर्णय झाला नाही. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वारगेट, संगमवाडी येथे खासगी जागा भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यातून त्यांच्या बस मार्गावर धावत आहेत. परंतु, रस्त्यावर पिकअपसाठी त्यांना अद्याप जागा मिळालेल्या नाहीत.

या मार्गांवर होते वाहतूक
नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नांदेड, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी मार्ग. 

शहरातून रोजच्या बस १६००
रोजचे प्रवासी ६४ हजार

राजाबहादूर मोतीलाल मिल रस्ता, भैरोबानाला चौक, कात्रजमधील राजीव गांधी उद्यान आणि वाकडेवाडीतील जमनालाल बजाज पुतळा आदी ठिकाणी बस व्यावसायिकांनी पिकअप पॉइंट्‌स मागितले होते. तसेच, स्थानकासाठी जागा मागत आहोत. त्यासाठी व्यावसायिक भाडेही भरायला तयार आहोत. परंतु, कार्यवाही होत नाही.  
- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्‍ट लक्‍झरी बस असोसिएशन 

वाहतूक पोलिस, आरटीओ आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच याबाबत संयुक्त पाहणी होणार आहे. त्यानंतर बस व्यावसायिकांना पिकअप पॉइंट्‌ससाठी जागा कोठे उपलब्ध करून देता येईल, याचे नियोजन करण्यात येईल.  ही प्रक्रिया येत्या १५ दिवसांत सुरू होईल.
- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभागप्रमुख, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT