Air transport will continue from Pune airport esakal
पुणे

पुणे विमानतळावर जाण्यासाठी 5 डेपोंमधून बससेवा

सकाळ वृ्त्तसेवा

पुणे : शहराच्या विविध भागांतून विमानतळावर जाण्याऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) १० गाड्या उपलब्ध केल्या आहेत. बुधवारी (ता. १६) सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत शहरातील पाच डेपोमधून विविध मार्गांनी या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली आहे.

विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी पीएमपीने अभि (एयरपोर्ट बस फॉर बिझनेस होम ॲण्ड हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी) ही स्मार्ट एसी बससेवा पुरविली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनमुळे शासन निर्देशानुसार पीएमपीचे बस संचलन बंद ठेवले होते. परंतु, आता पीएमपीची बससेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. त्या अनुषंगाने ‘अभि’ ही स्मार्ट एसी बससेवा बुधवारपासून पुन्हा सुरू केली आहे.

बस सुटण्याचे ठिकाण - बसची संख्या- बसच्या वेळा

हिंजवडी फेज ३ - २- 06.10, 10.00, 14.00, 1800

भेकराईनगर - २- 06.40, 07.40, 08.40, 09.40, 11.10, 12.10,

14.00, 15.00, 16.00, 17.00, 18.00, 19.00

स्वारगेट - २- 06.30, 07.30, 09.00, 10.00, 12.00, 13.00, 15.00, 16.00, 17.30, 18.30

कोथरूड स्टॅण्ड - २- 06.20, 07.20, 08.50, 09.50, 11.50, 12.45, 15.10, 16.10, 17.40, 1840

निगडी (भोसरी व विश्रांतवाडी मार्गे) - १ - 07.40, 10.20, 13.20, 17.15,

निगडी (वाकडेवाडी मार्गे) - १ - 06.40, 10.35, 15.00

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT