Bus Sakal
पुणे

'काका बस थांबवा ना' बसथांबे काढल्यामुळे बिबवेवाडीतील विध्यार्थ्यांचे हाल

'काका बस थांबवा ना' दररोज रस्त्यावर थांबून बसवाल्या काकांना हाक द्यावी लागत आहे.

नितीन बिबवे

'काका बस थांबवा ना' दररोज रस्त्यावर थांबून बसवाल्या काकांना हाक द्यावी लागत आहे.

बिबवेवाडी - 'काका बस थांबवा ना' दररोज रस्त्यावर थांबून बसवाल्या काकांना हाक द्यावी लागत आहे. परंतु, बस थांब्याचे ठिकाण निश्चित नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोठेही थांबावे लागत आहे.

स्वामी विवेकानंद मार्गावर प्रेम नगर सोसायटी ते अप्पर पर्यंत अडीच किलोमीटर अंतरावर दहा बस थांबे आहेत. परंतु, विवेकानंद मार्ग सिमेंट काँक्रीट चा करताना प्रेम नगर, इ एस आय हॉस्पिटल, बिबवेवाडी गावठाण, इंदिरा नगर, अप्पर कमान, अप्पर शेवटचा बस थांबा काढलेला आहे.

बिबवेवाडी गावठाण ते इंदिरा नगर बस थांब्यापर्यंत तीन बस थांबे असून महापालिकेच्या शाळांसह सहा शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे वीस हजार विध्यार्थी शिक्षण घेतात. परंतु, अनेक विद्यार्थी सर्वसामान्य घरातील असल्यामुळे त्यांना बस शिवाय पर्याय नाही. त्यामुळे विध्यार्थी जुन्या बस थांब्याच्या जागेवर उभे राहतात. परंतु, बस थांबा नसल्याने बस चालक त्या ठिकाणी बस थांबवत नाही. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना बस चालकाला आवाज देऊन बस थांबवावी लागते. त्यामुळे रस्त्यावर कोठेही बस थांबते. त्यातच विद्यार्थ्यांना दफ्तराचे ओझे पाठीवर घेऊन गर्दीत बस पकडावी लागत आहे, त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे.

रस्त्याची कामे करताना संबंधित बस थांबे काढल्यावर पुन्हा संबंधितानी पुन्हा बस थांबे लावणे गरजेचे आहे. परंतु, संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने बस थांबे गायब झाल्याचा आरोप रोशन शिंदे यांनी केला आहे.

विशाल धनगर (विद्यार्थी, इयत्ता, सहावी) - गावठाण चौकातील बस थांब काढलेला असून येथे बस थांबत नाही, बस ड्रायव्हर काकांच्या मनात आले तर बस कोठेही थांबवतात.

दत्तात्रय झेंडे (पीएमपीएल, वाहतूक व्यवस्थापक) - शहरातील बस थांब्याबाबत निविदा काढण्यात आली होती परंतु प्रतिसाद मिळाला नाही, नव्याने निविदा काढून बस थांबे तयार करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT