Cab drivers serving from the airport will on strike tomorrow agitation because fares are lower than rickshaws Sakal
पुणे

Cab Drivers Strike : विमानतळावरून सेवा देणाऱ्या कॅबचालकांचा उद्या संप

रिक्षांपेक्षा कमी भाडे मिळत असल्याने आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विमानतळावर कॅबची सेवा देणाऱ्या चालक-मालकांनी सोमवारी (ता. ९) सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ४०० चालक संपात सहभागी होणार असून, प्रवाशांना फटका बसणार आहे. चालक ‘आरटीओं’ना निवेदन देणार आहेत.

रिक्षाच्या तुलनेने कमी भाडे मिळत असल्याने विमानतळावर कॅबची सेवा देणाऱ्या ओला, उबेरच्या चालकांनी शुक्रवारी (ता. ६) अचानक संप केला होता. त्याचा फटका सुमारे पाच हजार प्रवाशांना बसला. शुक्रवारच्या संपात सुमारे ४०० चालक सहभागी झाले होते.

ओला, उबेरसाठी काम करणाऱ्या कॅब चालक व मालकांना प्रत्येक फेरीमागे मिळणारे भाडे अपेक्षेपेक्षा कमी आहे. रिक्षासाठी प्रति किलोमीटर १७ रुपये, तर कॅबसाठी प्रति किलोमीटर १२ रुपये आकारले जातात, असे कॅब चालकांचे म्हणणे आहे.

त्या तुलनेत ओला, उबेरला मिळणारे कमिशन जास्त आहे. प्रवासी सेवा व वाहन आमचे असते. केवळ ग्राहक मिळवून देतात, म्हणून ते जास्त कमिशन आकारतात. त्यामुळे आमचे उत्पन्न घटल्याचे काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

प्रवाशांना फटका बसणार

विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी एरोमॉलच्या पार्किंगमध्ये कॅबची व्यवस्था केली आहे. दररोज सुमारे १५ हजार प्रवासी येतात आणि जातात. एका तासात सुमारे १०० कॅब एरोमॉलमधून बाहेर पडतात. संप झाल्यावर सुमारे पाच हजार प्रवाशांना फटका बसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT