rakhi sakal
पुणे

राखी बांधायला आल्या अन् हक्कसोडपत्र देऊन गेल्या!

धानोरेतील गावडे बंधूंना पाच बहिणींची अनोखी भेट

सकाळ वृत्तसेवा

आळंदी : आळंदीजवळील धानोरे येथील गावडे कुटुंबातील बहीण-भावांच्या प्रेमाची चर्चा सध्या परिसरात आहे. त्याला कारणही तसेच आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीला भेट देतो, मात्र या ठिकाणी पाच बहिणींनी मिळून पाच भावांना अनोखी भेट दिली आहे. राखी बांधायला आलेल्या या बहिणींनी कोट्यवधी रुपयांच्या सात एकर जमिनीतील हक्कसोडपत्र लिहून देत बंधुप्रेम दाखवले आहे.

पाच भाऊ अन्‌ पाच बहिणी असा गावडे कुटुंबीयांचा परिवार आहे. मच्छिंद्र गावडे, मारुती गावडे, सत्यवान गावडे, नथू गावडे, पांडुरंग गावडे यांना त्यांच्या बहिणी जिजाबाई विठ्ठल पोतले, अलका ज्ञानोबा मोझे, बायसाबाई वसंत रानवडे, शोभा मच्छिंद्र तापकीर, शारदा तानाजी हगवणे यांनी विनामोबदला जमिनीचा हक्क लिहून दिला आहे. खेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तांची नोंदणीदेखील करण्यात आली आहे.

वास्तविक, मच्छिंद्र गावडे हे अनेक वर्षे तुरुंगात राहिल्याने कुटुंबाची वाताहात झाली. मारुती गावडे पोलिस खात्यातून निवृत्त झाले आहेत. सत्यवान गावडे, नथू गावडे आणि पांडुरंग गावडे हे घरी खाण्यापुरती शेती करून दुधाचा व्यवसाय करतात. कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच आहे. मात्र, शिक्षण आणि पहिलवानकीच्या क्षेत्रात कुटुंबातील मुलांनी प्रगती केलेली आहे. सत्यवान गावडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत.

आता धानोरे औद्योगिक भागात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. बहुतांश ठिकाणी जमिनीच्या हक्कांवरून भाऊ-बहिणींचे वाद पाहायला मिळत आहेत. फसवणूक करून हक्कसोडपत्र घेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातून पुन्हा न्यायालयीन लढाईही पाहायला मिळते आहे. मात्र गावडे कुटुंबीय याला अपवाद ठरले.

आजही एकत्र कुटुंबाप्रमाणेच एकमेकांशी नाते निभावले जात आहे. भावांची लहानपणापासून झालेली आबाळ पाहून बहिणींनी यंदा भावांना रक्षाबंधनाला भेट देण्याचे ठरवले. रक्षाबंधनाच्या दिवशी याबाबत कुटुंबात चर्चा झाली आणि हक्कसोडपत्र करून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर दस्त नोंदवून बहिणींनी शब्द खरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT