shivtare_1.jpg
shivtare_1.jpg 
पुणे

नवीन धरण बांधणे शक्य नाही : शिवतारे 

सकाळवृत्तसेवा


पुणे : ''नवीन धरणे बांधणे आता शक्य नाही, यापूर्वी बांधलेल्या धरणांतील पाणीसाठ्याचा वापर योग्य पध्दतीने करण्याची गरज आहे. ठिबक सिंचनाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे, ''असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदरावदादा पाटील यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित 'प्राथमिक पाणलोटातील पाण्याचे समन्यायी वाटप- काळाची गरज' या विषयावर गुरूवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. शिवाजीराव कदम, पाणी पंचायतीच्या अध्यक्ष कल्पना साळुंखे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, जलतज्ज्ञ प्रा. विजय परांजपे, डॉ. बी पी. साबळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

शिवतारे म्हणाले, ''राज्यात चितळे, बर्वे, सुकथनकर असे सहा आयोग झाले. परंतु जलसिंचन आणि जलसंधारणाची कामे प्रभावीपणे झाली पाहिजेत. यापूर्वी व्यापक महाराष्ट्राच्या हिताचा विचार झाला नाही. नियोजन झाले नाही. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप झाले नाही. युती सरकारने टेंभूसारख्या सहा उपसा सिंचन योजना राबविल्या. खडकवासला 85 हजार 30 टीएमसी पैकी 20 टीएमसी पिण्यासाठी वापरावे लागते. सिंचनाचे लाभक्षेत्र 75 हजार हेक्टर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही पाणी मिळाले पाहिजे. नवीन धरणे बांधणे आता शक्य नाही, यापूर्वी बांधलेल्या धरणांतील पाणीसाठ्याचा वापर योग्य पध्दतीने करण्याची गरज आहे. ठिबक सिंचनाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. गुंजवणी धरण आणि लाभक्षेत्रातील अंतरातील शेतकऱ्यांना विजेचा वापर न करता पाणी देण्याचे नियोजन आहे.''

यावेळी थोरात म्हणाले, ''नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय सरकारी योजना यशस्वी होणार नाहीत. लोकसहभागातून पाण्याचे नियोजन झाले पाहिजे.'' तर ''वाढत्या नागरीकरणामुळे सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या धरणांतील पाणी शहरातील लोकांच्या पिण्यासाठी व इतर वापरासाठी  राज्यातील सिंचन क्षमता 35 टक्क्यांवर जाणे अशक्य आहे. '' , असे मत माधव भंडारी यांनी मांडले. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT